FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची पहिल्या सत्रात बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 06:40 PM2018-06-21T18:40:09+5:302018-06-21T18:40:09+5:30
डेन्मार्कला सामन्याच्या सातव्याच मिनिटाला गोल करण्यात यश आले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ रंगला.
मॉस्को : डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फुटबॉल विश्वचषकातील लढतीचे पहिले सत्र चांगलेच रंगतदार ठरले. डेन्मार्कला सामन्याच्या सातव्याच मिनिटाला गोल करण्यात यश आले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगला खेळ रंगला. पण ऑस्ट्रेलियाने 38व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी केली.
A decent half of football in Samara! #DENAUSpic.twitter.com/C9LxuFAszp
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018
डेन्मार्कने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार आक्रमण लगावले होते. आपल्या या रणनितीमध्ये त्यांना सातव्याच मिनिटाला यश आले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला ख्रिस एरिक्सनने जोरदार गोल लगावत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी डेन्मार्कला अर्धातास टिकवता आली. कारण त्यानंतर सामन्याच्या 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिले जेडीनॅकने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.