FIFA Football World Cup 2018 : तुम्हाला हे माहिती आहे का... अंतिम फेरीत जाणार ' हा ' संघ, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 23:01 IST2018-07-10T22:42:26+5:302018-07-10T23:01:21+5:30
अचिलिस या मांजरीपुढे दोन्ही देशांचे झेंडे ठेवले जातात. त्याचबरोबर दोन्ही देशांपुढे तिचा खाऊ ठेवला जातो. ज्या देशाच्या झेंड्याजवळ जाऊन अचिलिस खाऊ खाते तो संघ जिंकतो, असे म्हटले जाते.

FIFA Football World Cup 2018 : तुम्हाला हे माहिती आहे का... अंतिम फेरीत जाणार ' हा ' संघ, पाहा व्हिडीओ
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर आता चांगलाच चढू लागयाय. विश्वचषकामध्ये आता दोन उपांत्य आणि एक अंतिम असे तीन सामने शिल्लक आहेत. आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार या गोष्टीची. पण या विश्वचषकासाठी अचिलिस या मांजरीने मात्र पहिल्या उपांत्य फेरीचा कौल दिला आहे. हा कौल फ्रान्सच्या बाजूने आहे की बेल्जियमच्या, ते तुम्हाला माहिती आहे का...
अचिलिस या मांजरीपुढे दोन्ही देशांचे झेंडे ठेवले जातात. त्याचबरोबर दोन्ही देशांपुढे तिचा खाऊ ठेवला जातो. ज्या देशाच्या झेंड्याजवळ जाऊन अचिलिस खाऊ खाते तो संघ जिंकतो, असे म्हटले जाते.
हा पाहा व्हिडीओ (सौजन्य : लाईफ फुटबॉल)
उपांत्य फेरीचा सामना सुरु होण्यापूर्वी फ्रान्स आणि बेल्जियम या दोन्ही देशांचे झेंडे ठेवण्यात आले. त्याचबरोबर दोन्ही झेंड्याच्या बाजूला तिचा खाऊही ठेवण्यात आला. अचिलिसने यावेळी बेल्जियमच्या झेंड्या जवळचा खाऊ खाल्ला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत फ्रान्सवर मात करत बेल्जियमचा संघ अंतिम फेरीत पोहोचणार, असे म्हटले जात आहे.