FIFA Football World Cup 2018 : रांगड्या खेळामुळे सेनेगलचे आव्हान संपुष्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 09:43 PM2018-06-28T21:43:46+5:302018-06-28T21:45:23+5:30
विश्वचषकातील निर्णायक लढतीमध्ये सेनेगल आणि जपान यांना 0-1 या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले. दोन्ही संघाचा गोलफरकही सारखाच होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्त पिवळे कार्ड कोणाला जास्त मिळाले ते पाहिले गेले.
मॉस्को : जपान आणि सेनेगल यांचे समान गुण असले (4) तरी फुटबॉल या खेळात वर्तणूक बघितली जाते. त्यामुळे आतापर्यंत जास्त रांगडा खेळ केल्यामुळे गुण समान असूनही सेनेगलचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. कोलंबियाने मात्र सेनेगलवर 1-0 असा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे.
Group H came down to the finest of margins. #JPN go through ahead of #SEN, with the Lions of Teranga eliminated on Fair Play points. pic.twitter.com/YCDk0hSWmL
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 28, 2018
विश्वचषकातील निर्णायक लढतीमध्ये सेनेगल आणि जपान यांना 0-1 या फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे दोन्ही संघांचे समान गुण झाले. दोन्ही संघाचा गोलफरकही सारखाच होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्त पिवळे कार्ड कोणाला जास्त मिळाले ते पाहिले गेले. आतापर्यंत सेनेगलला सहा तर जपानला चार पिवळी कार्डे मिळाली आहेत. जपानपेक्षा दोन पिवळी कार्डे जास्त असल्यामुळे सेनेगलला विश्वचषकातील आव्हान कायम राखता आले नाही.
Yerry Mina heads #COL into Round of 16, as they leap to top of Group H.#SENCOLpic.twitter.com/y58w4H5AaI
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 28, 2018
सामन्याच्या पहिल्या सत्रात कोलंबिया आणि सेनेगल यांची गोलशून्य बरोबरी होती. पण सामन्याच्या 74व्या मिनिटाला येरी मिनाने कोलंबियासाठी निर्णायक गोल लगावला. या गोलच्या जोरावर कोलंबियाने सहा गुणांसह ' एच ' गटात सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.