FIFA Football World Cup 2018 : थरारक सामन्यात इंग्लंडचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 02:29 AM2018-07-04T02:29:43+5:302018-07-04T02:37:02+5:30

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली.  इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली.

FIFA Football World Cup 2018: England victory in thrilling match | FIFA Football World Cup 2018 : थरारक सामन्यात इंग्लंडचा विजय

FIFA Football World Cup 2018 : थरारक सामन्यात इंग्लंडचा विजय

Next

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली.  इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. दोन्ही संघाकडून तोडीसतोड खेळ झाला. पेनल्टी शूटआऊटमध्येही नाट्याचे सत्र सुरुच राहिले. कोलंबियाच्या गोलरक्षकाने इंग्लंडला बॅकफुटवर टाकले, परंतु आघाडीच्या संधीवर त्यांच्या खेळाडूकडून चुकीचा फटका बसला. त्यानंतर गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला आणि एरीक डायरने त्यावर विजयाचा कळस चढवला. इंग्लंडने 4-3 (1-1) अशी बाजी मारून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर स्वीडनचे आव्हान असणार आहे.


इंग्लंडला पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवूनही कोलंबियाने गोलशून्य बरोबरीत रोखले. संघाचा प्रमुख खेळाडू जेम्स रॉड्रीगेज दुखापतीमुळे या लढतीला मुकला. त्याही परिस्थितीत कोलंबियाने कौतुकास्पद खेळ केला. 41 व्या मिनिटाला पेनल्टी क्षेत्राबाहेरून मिळालेल्या फ्री किकवर इंग्लंडच्या खेळाडूला अपयश आले. सामन्याच्या सुरुवातीलाच हॅरी केनने हेडरव्दारे गोल करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.  



मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून गोलचे वारंवार प्रयत्न सुरू झाले, परंतु 58व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर इंग्लंडने आघाडी घेतली. कार्लोस सांचेझने पेनल्टी क्षेत्रात इंग्लंडच्या कर्णधार हॅरी केनला पाडले आणि पंचांनी त्वरीत स्पॉट किकचा इशारा दिला. केनने त्यावर कोलंबियाच्या गोलरक्षक डेव्हिड ऑस्पिनाला चकवून इंग्लंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 


विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणा-या खेळाडूंमध्ये केन ( 7) दुस-या स्थानी झेप घेतली आहे. या यादित गॅरी लिनकर दहा गोलसह अव्वल स्थानावर आहेत. 81व्या मिनिटाला कोलंबियाला बरोबरीची आयती संधी चालून आली होती, परंतु बाक्काने ती गमावली. भरपाई वेळेच्या तिस-या मिनिटाला येरी मिनाने हेडरव्दारे अप्रतिम गोल करून कोलंबियाला विजयाच्या आशा दाखवल्या. त्यामुळे भरपाई वेळेत सुटणारा हा सामना अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात ताणला गेला. त्यातही निकाल 1-1 असाच राहील्याने पेनल्टी शूटआऊटचा खेळ रंगला.

Web Title: FIFA Football World Cup 2018: England victory in thrilling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.