FIFA Football World Cup 2018 : ‘त्याचे’ घर बनले अर्जेटिनामय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 17:34 IST2018-06-29T17:33:30+5:302018-06-29T17:34:17+5:30
भारतात क्रिकेट वेडे खूप आहेत. घरावर तुळशीपत्र ठेउन केवळ क्रिकेट एके क्रिकेट अशी गणना करणाºयांची संख्या काही कमी नाही. सध्या जगभर वादळ सुटलय ते फुटबॉलचं. हे वादळ कोलकात्यातही धुमाकूळ घालत आहे अणि म्हणूनच एका फुटबॉल चाहत्याने आपल घरच ‘अर्जेटिनामय’ करुन ठेवलंय.

FIFA Football World Cup 2018 : ‘त्याचे’ घर बनले अर्जेटिनामय!
‘त्याचे’ घर बनले अर्जेटिनामय!
कोलकात्याच्या चाहत्याची अजब कहाणी
सचिन कोरडे : भारतात क्रिकेट वेडे खूप आहेत. घरावर तुळशीपत्र ठेउन केवळ क्रिकेट एके क्रिकेट अशी गणना करणाºयांची संख्या काही कमी नाही. सध्या जगभर वादळ सुटलय ते फुटबॉलचं. हे वादळ कोलकात्यातही धुमाकूळ घालत आहे अणि म्हणूनच एका फुटबॉल चाहत्याने आपल घरच ‘अर्जेटिनामय’ करुन ठेवलंय. परिसरातही या चाहत्याची जबरदस्त चर्चा रंगत आहे. आहे तरी कोण हा?...
५३ वर्षीय शिब शंकर पात्रा. एका टी स्टॉलचा मालक. हा अर्जेटिना जबरा फॅन. फुटबॉल या खेळाची ओळख पटल्यापासून शिब शंकर अर्जेटिना संघालाच सपोर्ट करतोय. जेव्हा अर्जेटिनाचा सामना असतो तेव्हा हा ग्राहकांना मोफत चहा वाटतो. मेस्सीवर त्याचे अपार प्रेम आहे. मेस्सीचे भलंमोठं पोस्टर त्याने घराच्या दरवाज्यावर लावले आहे. दोन मजली मोठी इमारत त्याने ब्ल्यू आणि पांढºया रंगाने रंगवली आहे. ही इमारत अर्जेटिनामय झाल्यासारखी वाटते. आता या इमारतीला बघायला बघ्यांची गर्दी होत आहे. इमारतींचे फोटो आणि शिब शंकरसोबत सेल्फी काढण्याचा कार्यक्रम रोज सुरु असतो.
अर्जेटिना संघ आता बाद फेरीत पोहचला. याचा शिब शंकरला खूप आनंद झालाय. अर्जेटिनाचा सामना प्रत्यक्षात पाहण्याचं आपलं स्वप्न होतं. एका ट्रॅव्हल एजेन्सीकडून आपण रशियात जाण्याबाबत माहितीही काढली होती. पण, माझ्याजवळील ६० हजार रुपयांची बचत पुरेशी नव्हती. त्यामुळे वर्ल्ड कप ट्रिप रद्द करुन मी एवढ्या पैशात इमारत रंगवण्याचा निर्णय घेतला. मला कोणतेही व्यसन नाही. व्यसन आहे ते केवळ अर्जेटिना आणि मेस्सीचे. माझी मिळकत जास्त नाही. पण, मी विश्वचषकात अर्जेटिना खेळताना नक्की पाहणार, असे तो एका मुलाखतीत सांगतो.
दरम्यान, कोलकात्याच्या नॉर्थ २४ परागना या भागात शिब शंकरचे घर आहे. विश्वचषक दर चार वर्षातून होतो. दर चार वर्षांनंतर तो इमारतीला अर्जेटिनाच्या ध्वजाच्या रंग देतो. इमारतीच्या तळमजल्यावर त्याचे स्नॅक आणि टी सेंटर आहे. शिबचा मोठा परिवारही आहे. पण परिवातील सदस्यांचा विचार न करता तो आपले फुटबॉप्रेम सिद्ध करतो. त्याला २० वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. मुलगा शुभम हा मेस्सीचा फॅन आहे.