FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या संघावर फेडरर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 09:47 PM2018-07-05T21:47:17+5:302018-07-05T21:47:51+5:30

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली.

FIFA Football World Cup 2018: Federer Strikes the Swiss Squad | FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या संघावर फेडरर भडकला

FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडच्या संघावर फेडरर भडकला

Next
ठळक मुद्देस्वीडनने अनपेक्षित निकाल नोंदवताना 1-0 असा विजय मिळवून स्वित्झर्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

विम्बल्डन - फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आणि विम्बल्डन टेनीस स्पर्धा यांच्यातील वेळा समान असल्यामुळे टेनिसपटू अँडी मरेने नाराजी प्रकट केली होती. मात्र स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने वेळात वेळ काढून विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या त्याच्या राष्ट्रीय संघाचा खेळ पाहीला, परंतु त्याच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. त्यानंतर भडकलेल्या फेडररने राष्ट्रीय फुटबॉलपटूंची कानउघडणी केली. 
शांत स्वभावाच्या फेडररने मंगळवारी स्वित्झर्लंड आणि स्वीडन यांच्यातील बाद फेरीतील लढत आवर्जुन पाहिली. या लढतीत स्वित्झर्लंडचे पारडे जड मानले जात होते. मात्र स्वीडनने अनपेक्षित निकाल नोंदवताना 1-0 असा विजय मिळवून स्वित्झर्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. तत्पूर्वी इ गटातील पहिल्याच सामन्यात त्यांनी बलाढ्य ब्राझिलला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला होता.  त्यात त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक देताना चाहत्यांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यात फेडररचाही समावेश होता. 
मी संघाकडून बरीच अपेक्षा केली होती. पण त्यांनी मला निराश केले, अशा शब्दात फेडररने नाराजी प्रकट केली. तो पुढे म्हणाला, बाद फेरीत असा निकाल अपेक्षीत नव्हता. स्वीडनविरूद्ध आम्हाला विजयाची संधी होती, पण ती आम्ही गमावली. आमच्या खेळाडूंनी गोल करण्याचे प्रयत्नही केले नाही. असा खेळ केल्यावर संघ उपांत्यपूर्व फेरीत जाण्यास पात्रच नव्हता, असे मला वाटते.  
 

Web Title: FIFA Football World Cup 2018: Federer Strikes the Swiss Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.