FIFA Football World Cup 2018 : पहिल्या सत्रात ब्राझीलचे थंडा, थंडा... कूल, कूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 20:31 IST2018-07-02T20:30:15+5:302018-07-02T20:31:25+5:30
ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला.

FIFA Football World Cup 2018 : पहिल्या सत्रात ब्राझीलचे थंडा, थंडा... कूल, कूल
समारा : ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ थंडा, थंडा... कूल, कूल असाच राहिला. दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नाही, त्यामुळे पहिले सत्र ०-० असे बरोबरीत होते.
For the first time in the knock-out stages of this #WorldCup it is 0-0 at half-time...#BRAMEXpic.twitter.com/kJyDArLJhL
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 2, 2018
ब्राझीलला मेक्सिकोच्या संघाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या सत्रात बचाव करण्यावर अधिक भर दिला. मेक्सिकोच्या संघाने सामन्यात चांगले आक्रमण लगावले, पण त्यांना एकही फटका गोलजाळ्याजवळ मारता नाही आला. कारण ब्राझीलने या सामन्यातील पहिल्या सत्रात अभेद्द बचाव केला. ब्राझीलने तीनवेळा मेक्सिकोच्या गोलजाळ्यावर आक्रमण केले, पण मेक्सिकोचा गोलरक्षक ग्युलेर्मो ओचोआने चांगला बचाव केला. दुसऱ्या सत्रात जर ब्राझीलला गोल करून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना ओचोआचा बचाव भेदणे क्रमप्राप्त असेल.