FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 18:37 IST2018-06-24T18:37:31+5:302018-06-24T18:37:59+5:30
पनामाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंडने तब्बल पाच गोल करत तुफानी कामगिरीचा नमुना पेश केला.

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचे पहिल्याच सत्रात पाच गोल
मॉस्को : पनामाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात इंग्लंडने तब्बल पाच गोल करत तुफानी कामगिरीचा नमुना पेश केला. पहिल्या सत्रात स्टोन्स आणि केन यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला स्टोन्सने इंग्लंडसाठी पहिला गोल केला आणि संघाचे खाते उघडले. त्यानंतर सामन्याच्या 22 व्या मिनिटाला इंग्लंडला स्पॉट किक मिळाली आणि केनने या संधीचा चांगला फायदा उचलत संघासाठी दुसरा गोल केला. सामन्याच्या 36व्या मिनिटाला लिंगार्डने इंग्लंडसाठी गोल केला.
Captain Kane 💪 #ENGPANpic.twitter.com/6SrXY8949O
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 24, 2018
आठव्या मिनिटाला गोल करणाऱ्या स्टोन्सने सामन्याच्या 40व्या मिनिटाला चमक दाखवली आणि त्याने संघासाठी चौथा गोल करत आपला दबदबा निर्माण केले. निर्धारीत 45 मिनिटानंतर दिलेल्या भरपाई वेळेत इंग्लंडला पुन्हा एकदा स्पॉट किक मिळाली आणि पुन्हा एकदा केनने गोल केला.