FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलदेखील होतोय जंटलमन्स गेम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 10:07 PM2018-06-28T22:07:14+5:302018-06-28T22:08:19+5:30
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो.
आकाश नेवे : फुटबॉल म्हणजे रांगडा खेळ असे म्हटले जाते. खेळाडूंना धक्का देत, काही वेळेला त्यांना पाडत त्यांच्याकडून चेंडू हिसकावण्याचा प्रयत्न केला जातो. या चुका केल्यावर खेळाडूंना मैदानावरील पंच ताकिद देतात. पण काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे खेळाची प्रतिमा सुधारण्यास मदत होत आहे. फुटबॉलदेखील आता जंटलमन्स गेम होत चालला आहे, अशी मते जगभरातील चाहत्यांनी व्यक्त केली आहेत.
काय आहे फेअर प्ले पॉईंट, ते जाणून घ्या
संघातील कोणत्याही खेळाडू पहिल्यांदा पिवळे कार्ड दिले गेले. तर - १ गुण संघाच्या खात्यात पकडला जातो. त्याच खेळाडूला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दिले गेले तर - ३ गुण पकडले जातात. थेट लाल कार्ड दिले गेले तर - ४ गुण आणि पिवळे कार्ड आणि नंतर थेट लाल कार्ड दिले तर - ५ गुण पकडले जातात.
फेअर प्ले पॉईंट नुसार जपानने ग्रुप एचमधून बाद फेरी गाठली आहे. सेनेगल आणि जपानचे गुण चार असे बरोबरीत आहेत. तसेच या दोन्ही संघातील गोल फरकही १ असा बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघाबाबत बाद फेरीचा निर्णय फेअर प्ले पॉईंट नुसार घेतला गेला. त्यात जपानचे गुण -४ आहेत. तर सेनेगलचे गुण -६ आहेत.
FAIR PLAY: Japan (-4) versus Senegal (-6).#JPN are the FIRST team in history to progress on the Fair Play rule.#SEN are the first to be eliminated by Fair Play.#WorldCup
— Gracenote Live (@GracenoteLive) June 28, 2018
जपानला बाद फेरीत पोहचण्यासाठी एका विजयाची किंवा बरोबरीची आवश्यकता होती. मात्र या गटातील दुसºया साखळी सामन्यात कोलंबियाने सेनेगलवर १ ० असा विजय मिळवला. सेनेगल आणि जपान यांचे चार गुण राहिले. तसेच गोलची संख्याही दोन्ही संघाची सारखीच होती. अशा परिस्थितीत फेअर प्ले पॉईंट दिले जातात. जपानच्या संघाचे फेअर प्ले पॉईंट -४ आहेत. तर सेनेगलच्या संघाचे -६ आहेत. त्या नुसार जपानने बाद फेरीत प्रवेश केला आहे.