FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:26 PM2018-07-12T16:26:25+5:302018-07-12T16:27:53+5:30

रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले.

FIFA Football World Cup 2018: India's Two Big B's at Russia; Video viral | FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

FIFA Football World Cup 2018 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताच्या दोन 'बिग बीं'चं दर्शन; व्हिडीओ व्हायरल

Next

मॉस्को - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा ज्वर संपूर्ण जगभरात दिसत आहे. त्यात आपण भारतीयही कुठे पिछाडीवर नाही. क्रिकेडवेड्या या देशात विश्वचषकाच्या निमित्ताने फुटबॉल प्रेमाचे वारे वाहत आहेत. रशियात सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात भारताकडून हजारो फुटबॉलप्रेमी दाखल झाले आहेत. बॉलिवूड नायकांना आणि उद्योगपतींनाही फुटबॉलचा मोह आवरता आला नाही. त्यामुळेच ते थेट रशियात दाखल झाले. भारतातल्या अशाच दोन ' बिग बीं'च दर्शन घडले. त्यांच्या उपस्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोण आहेत हे बिग बी चला जाणून घेऊया... 
कझान येथे खेळवण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमने धक्कादायक निकाल नोंदवताना माजी विजेत्या ब्राझील संघाला पराभवाचा धक्का दिला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्राझिलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्याने त्यांना विजय खेचून आणता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहीली आहे. ही लढत याची देही, याची डोळा पाहण्यासाठी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कझानच्या स्टेडियमवर उपस्थित होते. सामन्याच्या मंध्यंतराला हे दोघेही प्रेक्षकांमधून वाट काढत आपल्या आसनाकडे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 
पाच वेळा विश्वचषक जिंकणा-या ब्राझील संघाला पाठिंबा देण्यासाठी बच्चन आणि अंबानी कझान स्टेडियमवर उपस्थित होते. पण दुर्दैवाने ब्राझील पराभूत झाल्याने बच्चन यांचा हिरमोड झाला, परंतु दोन्ही संघांतील खेळाडूंचा उत्तम खेळ पाहता आल्याचे समाधान बच्चन यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले. 


Web Title: FIFA Football World Cup 2018: India's Two Big B's at Russia; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.