FIFA FOOTBALL World Cup 2018: एमबापे ठरला फ्रान्ससाठी सर्वात युवा गोल करणारा खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 09:38 PM2018-06-21T21:38:46+5:302018-06-21T21:38:46+5:30
किलियन एमबापे फ्रान्ससाठी विश्वचषकात गोल करणार सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पेरु संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात एमबापेने गोल केला.
मॉस्को : किलियन एमबापे फ्रान्ससाठी विश्वचषकात गोल करणार सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पेरु संघाविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात एमबापेने गोल केला. त्यामुळे पहिल्या सत्रात फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवता आली.
सामन्याच्या सुरुवातीला पेरुने आक्रमक खेळ केला. पण सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटांनंतर फ्रान्सने सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर फ्रान्सने पेरुवर जोरदार आक्रमणे लगावली, पण त्यांनी काही मिनिटे यश मिळत नव्हते. सामन्याच्या 34व्या मिनिटाला एमबापेने सहजपणे गोल केला आणि फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
A historic goal give #FRA the advantage in Ekaterinburg...#FRAPERpic.twitter.com/XI1If6Ocbd
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018
फ्रान्सने 1998 साली विश्वचषकाला गवसणी घातली होती, त्याचवर्षी एमबापेचा जन्म झाला. विशीमध्ये पोहोचलेला एमबापे हा फ्रान्सचा सर्वात युवा गोल करणारा खेळाडू ठरला आहे.