FIFA Football World Cup 2018 : मेस्सीची जादू चालली... अर्जेंटीनाला पहिल्या डावात आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:17 AM2018-06-27T00:17:08+5:302018-06-27T00:19:23+5:30
अटीतटीच्या लढतीत अर्जेंटीनासाठी संकटमोचक ठरतो तो लिओनेल मेस्सी आणि या गोष्टीचा प्रत्यय फुटबॉल विश्वचषकातील नायजेरियाविरुद्धच्या सामन्यातही आला.
मॉस्को : अटीतटीच्या लढतीत अर्जेंटीनासाठी संकटमोचक ठरतो तो लिओनेल मेस्सी आणि या गोष्टीचा प्रत्यय फुटबॉल विश्वचषकातील नायजेरियाविरुद्धच्या सामन्यातही आला. मेस्सीने सामन्याच्या 14व्या मिनिटाला दमदार गोल करत अर्जेंटीनाला पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
Messi vs #NGA 2014 ⚽️⚽️
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 26, 2018
Messi vs #NGA 2018 ⚽️#NGAARG#WorldCuppic.twitter.com/2D55qzadU5
सामन्याच्या सुरुवातीला अर्जेंटीनाकडून काही चुका झाल्या. पण काही मिनिटांत त्यांनी या चुका सुधारल्या. सामन्याच्या 14व्या मिनिटाला मेस्सीकडे चेंडू आला. त्याने तो चेंडू मांडीवर घेऊन पायाच्या बोटांवर आणला. त्यानंतर वेगात असलेल्या चेंडूला त्याने काही क्षण स्पर्शही केला नाही. गोल बनवण्यासाठी त्याने जागा बनवली आणि तिसऱ्या फटक्यात त्याने हा गोल केला. विश्वचषकातील हा शंभरावा गोल ठरला आहे.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 26, 2018
👉 #ARG have won 29/30 World Cup matches in which they were leading at half-time, the only exception the 4-2 defeat in the 1930 final against #URU
👉 Saint Petersburg Stadium is the 100th stadium where Leo Messi has scored a goal for #ARG or Barcelona #NGAARGpic.twitter.com/Lm1Xo3yDRw