FIFA Football World Cup 2018 : जपान आणि सेनेगल यांचे प्रत्येकी एक गोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 09:28 PM2018-06-24T21:28:37+5:302018-06-24T21:30:07+5:30
फुटबॉल विश्वचषकातील जपान आणि सेनेगल यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र 1-1 असे बरोबरीत सुटले.
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातील जपान आणि सेनेगल यांच्यातील सामन्याचे पहिले सत्र 1-1 असे बरोबरीत सुटले. सेनेगलने सामन्याच्या अकराव्या मिनिटालाच गोल केला होता. पण जपाननेही हार मानली नाही. त्यांना सामन्याच्या 34व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
The right place, the right time. #SEN lead in Ekaterinburg! #JPNSENpic.twitter.com/lEZhCtowLq
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 24, 2018
सामन्याच्या सुरुवातीपासून सेनेगलने चांगले आक्रमण केले. पण त्यांना हा पहिला गोल करता आला तो जपानच्या बचावपटूच्या चुकीमुळेच. कारण चेंडू जपानच्या गोलपोस्टजवळ होता, तरीही त्यांच्या बचावपटूने चेंडू दूर भिरकावला नाही. त्याची ही चुक सेनेगलच्या पथ्यावर पडली आणि सेनेगलाच्या सादिओ मानेने पहिला गोल केला.
How are you feeling, #JPN fans? #JPNSEN 1-1 pic.twitter.com/KV2Spo4O57
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 24, 2018
पहिला गोल झाल्यावर सेनेगलने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. या गोष्टीचाच फायदा यावेळी जपानने घेतला. जपानच्या ताकाशी इनुइने अप्रतिम गोल करत जपानला सामन्यात 1-1 अशी बरोबरी करून दिली.