FIFA Football World Cup 2018 : पहिल्या सत्रात पेरुचा ऑस्ट्रेलियाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:38 PM2018-06-26T20:38:19+5:302018-06-26T20:39:21+5:30
फुटबॉल विश्वचषकामध्ये एकही सामना न जिंकलेल्या पेरु संघाने मंगळवारच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रातच धक्का दिला.
मॉस्को : आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकामध्ये एकही सामना न जिंकलेल्या पेरु संघाने मंगळवारच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रातच धक्का दिला. पेरु संघाने सामन्याच्या सामन्याच्या 18व्या मिनिटाला गोल लगावला आणि ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर ढकलले. पेरु संघाच्या आंद्रे कोरिल्लोने संघासाठी पहिल्या सत्रात एकमेव गोल केला.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 26, 2018
👉 #AUS have won only one #WorldCup match after conceding the opener (W1-D2-L9), a 3-1 win against #JPN in 2006
👉 André Carrillo is the first player to score a World Cup goal for #PER since Guillermo la Rosa in 1982#AUSPERpic.twitter.com/FHNZczApbD
आतापर्यंत पेरुला एकही सामना जिंकता आलेला नाही, त्यामुळे हा सामना जिंकूनही त्यांना बाद फेरीत पोहोचता येणार नाही. पण ऑस्ट्रेलियाने मात्र हा सामना जिंकला तर त्यांना बाद फेरीत पोहोचता येऊ शकते. पण जर ऑस्ट्रेलियाला या सामन्यात बरोबरी साधता आली तर त्यांचे बाद फेरीत जाणे कठिण ठरू शकते.