FIFA Football World Cup 2018 : ते गुहेत अडकलेले खेळाडू वर्ल्डकप फायनल पाहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 09:00 AM2018-07-07T09:00:00+5:302018-07-07T09:00:00+5:30
नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूप सुटका झालेल्या थायलंडच्या 11 फुटबॉलपटूंना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.
ठळक मुद्देफिफाचे अध्यक्ष गियॅनी इन्फँटीनो यांनी या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण पाठवले आहे.
मॉस्को - नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूप सुटका झालेल्या थायलंडच्या 11 फुटबॉलपटूंना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. फिफाचे अध्यक्ष गियॅनी इन्फँटीनो यांनी या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण पाठवले आहे. मॉस्को येथे 15 जुलैला अंतिम लढत होणार आहे.
FIFA president Gianni Infantino has invited the 12 young Thai players and coach currently trapped in the Tham Luang cave to the World Cup Final should they get out on time. #WorldCuppic.twitter.com/ojsixAGSOr
— FIFA World Cup (@WorIdCupUpdates) July 6, 2018
23 जूनला हे खेळाडू थायलंडमधील एका गुहेत अडकले होते. नौदलाच्या अथक प्रयत्नानंतर नऊ दिवसांनी या खेळाडूंची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंनी नऊ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज यशस्वी ठरली. थायलंडचे नौदलाने या 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिकक्षकांना शोधण्यात यश मिळवले होते.
थायलंडमधील एका गुहेमध्ये अडकलेले सर्व खेळाडू 11 ते 16 वर्षे या वयोगटामधील होते. चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहात आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले. ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.