Fifa Football World Cup 2018 : रिकार्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालला आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 12:10 AM2018-06-26T00:10:37+5:302018-06-26T00:22:37+5:30
पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली.
मॉस्को : पोर्तुगालसारख्या दिग्गज संघाला इराणने फुटबॉल विश्वचषकाच्या सामन्यातील पहिल्या सत्रात चांगलेच झुंजवले. हा सामना एकतर्फी होईल, असे काही जणांना वाटले होते. पण इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला, पण पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिकार्डोने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली.
Our half-time graphic was ruined, but #POR fans will not care!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 25, 2018
They lead 1-0 at the interval. #IRNPORpic.twitter.com/IZq2DBlKDL
सामन्याच्या सुरुवातीला पोर्तुगालने चांगले आक्रमण केले. यावेळी इराणच्या खेळाडूंकडून काही चुकाही झाल्या. पण या गोष्टींचा फायदा मात्र पोर्तुगालच्या खेळाडूंना उचलता आला नाही. सामन्याच्या 45 व्या मिनिटाला मात्र पोर्तुगालला गोल करण्यात यश आले.
36 consecutive matches with a goal now ⚽️#WorldCup#IRNPORpic.twitter.com/FX5iErE0Cs
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 25, 2018