FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 01:28 AM2018-07-01T01:28:34+5:302018-07-01T01:46:48+5:30
लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला.
सोची - लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. उरुग्वेविरुद्धच्या बाद फेरीतील लढतीत पोर्तुगालला 2-1 असा पराभव पत्करावा लागला.
#URU WIN!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018
Two goals from @ECavaniOfficial means that it is @Uruguay that will face #FRA in Friday's quarter-final in Nizhny Novgorod!#URUPORpic.twitter.com/JA1dcK4ghM
उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे. एडीसन कवानीने हेडरव्दारे गोल करताना संघाला आघाडी मिऴवून दिली. लुईस सुआरेझच्या पासवर कवानीने गोलजाऴीच्या जलऴून केलेला प्रयत्न रोखण्यात पोर्तुगालचा गोलरक्षक अपयशी ठरला. ख्रिस्तियानो रोनाल्डोला फार संधीच उरुग्वेच्या खेऴाडूंनी दिली नाही.
An early goal from @ECavaniOfficial separates the two teams at the interval...#URUPOR // #WorldCuppic.twitter.com/hx3z1P48gT
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018
मध्यंतरानंतर सामन्याची उत्सुकता वाढली. स्पर्धेत आत्तापर्यंत एकही गोल न पत्करलेल्या उरुग्वेचा बचाव भेदण्यात पोर्तुगालच्या खेऴाडूंना सातत्याने अपयश येत होते. पण अखेरीस पेपेने 55व्या मिनिटाला झेप घेत गोलजाऴीच्या अगदी सरऴ रेषेत हेडरव्दारे गोल करत पोर्तुगालला बरोबरी मिऴवून दिली. स्पर्धेतील पहिला गोल खाल्ल्यानंतर उरुग्वेच्या बचावात ढिसाऴपणा जाणवला, परंतु कवानीच्या दुस-या सुपर गोलने उरुग्वेने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.
The perfect response to Portugal's equaliser from @Uruguay and @ECavaniOfficial! #URUPOR 2-1 pic.twitter.com/pSaOyzmfev
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018