Fifa Football World Cup 2018 : अखेरच्या लढतीत सौदी अरेबियाचा इजिप्तला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 09:50 PM2018-06-25T21:50:35+5:302018-06-25T21:51:31+5:30
भरपाई वेळेच्या पाचव्या मिनिटाला सालेमने निर्णायक गोल केला आणि त्यामुळेच सौदीला इजिप्तला 2-1 असे पराभूत करता आले.
मॉस्को : भरपाई वेळेमध्ये सालेमने केलेल्या गोलच्या जोरावर सौदी अरेबियाने फुटबॉल विश्वचषकात अखेरच्या लढतीत पहिला विजय मिळवला. पहिल्या सत्रात सौदी आणि इजिप्त यांची बरोबरी होती. पण सामन्याच्या अखेरच्या मिनिटांमध्ये सालेमने गोल करत इजिप्तला 2-1 असा पराभवाचा धक्का दिला. इजिप्तकडून एकमेव गोल करणाऱ्या मोहम्मद सलाहला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इजिप्तने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 22 व्या मिनिटाला मोहम्मद सलाहने गोल करून इजिप्तला आघाडी मिळवून दिली. मात्र मध्यंतराला काही अवधी असतानाच सौदी अरेबियाच्या फराजने पेनल्टी कीकवर गोल करून सौदी अरेबियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
🇸🇦🇸🇦🇸🇦
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 25, 2018
LATE drama. @salem_d29 ensures #KSA finish their #WorldCup on a high, on day @ElHadary, became a double #WorldCup record-maker. #KSAEGYpic.twitter.com/Qoy2AzbkcC
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ आक्रमक खेळ करत होते. पण दोन्ही संघांना निर्धारीत 90 मिनिटांमध्ये गोल करण्यात यश आले नाही. पण भरपाई वेळेच्या पाचव्या मिनिटाला सालेमने निर्णायक गोल केला आणि त्यामुळेच सौदीला इजिप्तला 2-1 असे पराभूत करता आले.