FIFA Football World Cup 2018 : मेस्सीच्या स्वप्नांचा चुराडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 09:28 PM2018-06-30T21:28:31+5:302018-06-30T21:29:39+5:30
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि लिओनेल मेस्सीच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
कझान - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाला पराभव पक्तरावा लागला. फ्रान्सने 4-3 असा विजय मिऴवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या पराभवामुऴे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले आणि लिओनेल मेस्सीच्या विश्वचषक उंचावण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
#FRA WIN! #FRAARG // #WorldCuppic.twitter.com/zejq1TCOxw
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018
मध्यंतरानंतरच्या तिस-याच मिनिटाला अर्जेंटिनाने आणखी एक धक्का देताना सामन्यात आघाडी घेतली. लिओनेल मेस्सीच्या पासवर गॅब्रियल मेर्काडोने हलका टच लावताना चेंडूला गोलजाऴीच्या दिशेने वाट मोकऴी करून दिली. पण विश्वचषक स्पर्धेत मागील सहा सामन्यांत पहिला गोल केल्यानंतर विजय मिऴवण्यात यशस्वी ठरलेल्या फ्रान्सने 57व्या मिनिटाला बेंजामिन पाव्हार्डने कारकीर्दितील पहिला आंतरराष्ट्रीय गोल करताना फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी मिऴवून दिली. त्यानंतर जे घडले ते अर्जेंटिनाला स्तब्ध केले. कॅलिन मॅब्पेने चार मिनिटांच्या फरकाने दोन गोल केले. या 19 वर्षीय खेऴाडूने अर्जेंटिनाच्या बचावफऴीला निष्प्रभ केले.
2 - Kylian Mbappe is the first teenager to score at least twice in a World Cup match since Pele vs Sweden in 1958. Boss. #FRA#ARG#FRAARG#WorldCuppic.twitter.com/3yS6qz5zCp
— OptaJoe (@OptaJoe) June 30, 2018
पहिल्या सत्रात ४१ व्या मिनिटाला डि मारियाने पेनल्टी क्षेत्राबाहेरून व्हॉलीव्दारे केलेल्या अप्रतीम गोलने अर्जेंटिनाला आशेचा किरण दाखवला. १३ व्या मिनिटाला अँटोनी ग्रिझमनने पेनल्टी स्पॉटकिकवर गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने आक्रमण केले. त्यामुळे अर्जेंटिनाचे खेळाडू प्रचंड दबाखाली दिसत होते. मात्र त्यांनी संघर्ष कायम राखताना अखेरच्या पाच मिनिटांत बरोबरी मिऴवली.
The first match of the knock-out stages has been lively. Nice. #FRAARG // #WorldCuppic.twitter.com/okjHTbt7mn
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 30, 2018