Fifa Football World Cup 2018 : मोरॅक्कोच्या बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 01:54 AM2018-06-26T01:54:32+5:302018-06-26T01:55:43+5:30
फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. पण या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे.
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. पण या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे.
GROUP B Ladies and Gentlemen.
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 25, 2018
Not sure about you....but we're off for a lie down. 🥵#WorldCup#ESPMAR#IRNPORpic.twitter.com/KiKTGlojZu
सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबने मोरॅक्कोसाठी पहिला गोल केला. त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनने त्यांच्यावर यशस्वी हल्ला चढवला. स्पेनच्या इस्कोने 19व्या मिनिटाला गोल केला आणि सामना मध्यंतरापर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला.
WHAT DRAMA.#ESP go through to face #RUS on Sunday. pic.twitter.com/DdrFnn3lLM
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 25, 2018
दुसऱ्या सत्रात मोरॅक्कोने आक्रमक खेळ केला. मोरॅक्कोच्या इन नेसयारीने गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मोरॅक्कोच्या या गोलनंतर स्पेनचा संघ खडबडून जागा झाला. त्यांनी भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला गोल करत सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली. स्पेनसाठी हा निर्णायक गोल इअॅगो अॅसपसने केला.