FIFA Football World Cup 2018 : स्वित्झर्लंडवर मात करत स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 09:26 PM2018-07-03T21:26:25+5:302018-07-03T21:28:35+5:30
रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर गोल करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला
सेंट पिटर्सबर्ग - रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर गोल करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. स्वीडनच्या फोर्सबेर्गने सामन्याच्या 66 मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. निर्धारित वेळेनंतरही स्वीडनकडे गोल करण्याची संधी होती, पण त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही.
#SWE WIN!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 3, 2018
Ten-man #SUI are knocked-out thanks to a deflected strike from @eforsberg10! #WorldCuppic.twitter.com/BDYSnxskt9
फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने 65 टक्के चेंडूवर ताबा ठेवला, त्यांनी स्वीडनपेक्षा पासेसही जास्त केले. पण स्वीडनपेक्षा जास्त आक्रमण करून स्वित्झर्लंडला गोल करण्यात अपयश आले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि हे सत्र 0-0 बरोबरीत राहिले.
The two other Round of 16 matches between European teams (#ESPRUS and #CRODEN) were both decided by penalties...
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 3, 2018
Do you reckon that is on the cards today?#SWESUI 0-0 pic.twitter.com/VNnpJwHlsI