FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेते सलग तिसऱ्यांदा साखळीतच बाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 09:00 AM2018-06-28T09:00:00+5:302018-06-28T09:00:00+5:30

१९६६ सालापासून प्रत्येक वेळी नवा विश्वविजेता

FIFA Football World Cup 2018: Third consecutive time the winner of the ex World Cup is out in first round | FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेते सलग तिसऱ्यांदा साखळीतच बाद 

FIFA Football World Cup 2018 : विश्वविजेते सलग तिसऱ्यांदा साखळीतच बाद 

Next
ठळक मुद्दे९६२ पासून कोणताही संघ सलग दोन वेळा विश्वचषक जिंकू शकलेला नाही. एवढेच नाही तर सलग तिसऱ्यांदा गतविजेत्या संघाला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. 

ललित झांबरे : प्रत्येक वेळी नवा विजेता, ही विश्वचषक फुटबॉलची परंपरा यंदासुद्धा कायम राहणार आहे. गतविजेत्या जर्मनीच्या साखळीतच गारद होण्याने ही मालिका अबाधित ठेवली आहे.  १९६२ पासून कोणताही संघ सलग दोन वेळा विश्वचषक जिंकू शकलेला नाही. एवढेच नाही तर सलग तिसऱ्यांदा गतविजेत्या संघाला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. 

जर्मन संघ विद्यमान विश्वविजेता म्हणून यावेळी रशियात मैदानात उतरला खरा पण त्यांची कामगिरी सुरूवातीपासूनच खराब राहिली. आधी मेक्सिको आणि बुधवारी दक्षिण कोरियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे  ‘एफ’ गटात चक्क शेवटच्या स्थानी राहिले. 

आपले विश्वविजेतपद कायम राखणारा ब्राझील हा शेवटचा संघ. त्यांनी १९५८ नंतर १९६२ ला पुन्हा विश्वचषक पटकावला. मात्र त्यानंतर सलग दुसºयांदा विश्वचषक कुणाच्याच हाती लागलेला नाही.

१९६६ -ब्राझील
१९६६ च्या स्पर्धेवेळी ब्राझीलला विश्वविजेतेपदाच्या हॅट्ट्रीकची संधी होती पण हंगेरी व पोर्तुगालकडून १-३ अशा सारख्याच फरकाच्या पराभवाने ते गटातच बाद झाले. 

१९७०- इंग्लंड
इंग्लंडच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली पण जर्मनीविरूद्ध २-० अशी सुरूवात केल्यावरही शेवटी ३-२ अशा पराभवाने त्यांचे आव्हान संपवले.

१९७४- ब्राझील
विश्वविजेत्यांनी पहिली फेरी पार करण्यात यश मिळवले मात्र दुसºया फेरीत नेदरलँडकून ०-२ असा पराभव त्यांचे आव्हान संपविणारा ठरला.

१९७८- पश्चिम जर्मनी
जर्मन संघाने दुसरीफेरी गाठली खरी पण दुसºया फेरीत ते एकही सामना जिंकू शकले नाहीत. नेदरलँड, इटली व ऑस्ट्रीयाकडून त्यांना पराभव पत्करावे लागले.

१९८२- अर्जेंटिना
दिएगो मॅराडोनाच्या या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनी संघ दुसºया फेरीत बाद झाला. दुसºया फेरीत इटली व ब्राझीलकडून त्यांना हार पत्करावी लागली.

१९८६- इटली
इटलीने साखळीच्या तीन सामन्यात एकदाही हार न पत्करता (१ विजय, दोन बरोबरी) बाद फेरी गाठली. पण बाद फेरीत फ्रान्सने २-० असा विजय मिळवून त्यांचे आव्हान संपवले.

१९९०- अर्जेंटिना
अर्जेंटिनाचा संघ अर्र्जेंटीना व इटलीवर पेनल्टीजवर विजय मिळवत अंतिम फेरीत धडकला होता पण विश्वविजेतपदाच्या सामन्यात आंद्रीयास ब्राम्हेच्या पेनल्टीवरील गोलने जर्मनीला विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि अर्जेंटीनाचा सलग दुसºयांदा विश्वचषक जिंकण्याचा मान हुकला. 

१९९४- जर्मनी
जर्मन संघाची वाटचाल उपांत्यपूर्व फेरीत बल्गेरियाने रोखली. मथायसने आघाडी दिल्यावरसुद्धा त्यांनी सामना १-२ असा गमावला.

१९९८- ब्राझील
ब्राझीलचा संघ नेदरलँडवर पेनल्टीजवर विजय मिळवत अंतिम फेरीत पोहचला पण अंतिम फेरीत फ्रान्सविरुद्ध ते एकसुद्धा गोल करू शकले नाहीत. उलट फ्रान्सकडून त्यांनी ०-३ असा मार खाल्ला.

२००२- फ्रान्स
विश्वविजेत्या संघाची कदाचित ही सर्वात खराब कामगिरी असावी. १९९८ मध्ये विश्वविजेतेपद पटकावलेल्या फ्रेंच संघाला साखळी फेरीतच बाद होताना एकसुद्धा गोल करता आला नाही. सेनेगलने १-० आणि डेन्मार्कने २-० अशी त्यांना मात दिली तर उरूग्वेने गोलशून्य बरोबरीत रोखले.

२००६- ब्राझील
यावेळी फ्रान्सने गतविजेत्या ब्राझीलचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपवले आणि त्यास कारण ठरला तो थिएरे हेन्रीचा ५७ व्या मिनिटाचा गोल.

२०१०- इटली
विश्वविजेते इटली पहिली फेरीसुद्धा पार करू शकले नाहीत. त्यांना गटवार साखळीत स्लोव्हेकियाकडून पराभव पत्करावा लागला तर पेराग्वे आणि न्यूझीलंडने त्यांना बरोबरीत रोखले.

२०१४- स्पेन
पुन्हा एकदा विश्वविजेता संघ  गटवार साखळीतच बाद झाला. यावेळी स्पेनला नेदरलँडने १-५ असा सणकून मार दिला तर चिलीनेही ०-२ असे पराभवाचे तोंड पहायला लावले.

२०१८- जर्मनी
२०१० व २०१४ नंतर  विश्वविजेता संघ गटवार साखळीच्या बाहेर पडू शकला नाही. जर्मन संघाला मेक्सिको व दक्षिण कोरियाने पराभवाचे धक्के दिले.

Web Title: FIFA Football World Cup 2018: Third consecutive time the winner of the ex World Cup is out in first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.