FIFA Football World Cup 2018 :इराणच्या हजारो महिलांनी पाहिला विश्वचषकाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:28 AM2018-06-27T05:28:18+5:302018-06-27T05:28:21+5:30

हजारो महिलांनी तेहरानमधील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्टेडियममध्ये विश्वचषकाचा सामना पाहिला.

FIFA Football World Cup 2018: Thousands of Iranians have seen the World Cup match | FIFA Football World Cup 2018 :इराणच्या हजारो महिलांनी पाहिला विश्वचषकाचा सामना

FIFA Football World Cup 2018 :इराणच्या हजारो महिलांनी पाहिला विश्वचषकाचा सामना

googlenewsNext

तेहरान : हजारो महिलांनी तेहरानमधील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्टेडियममध्ये विश्वचषकाचा सामना पाहिला. महिलांना सामना पाहण्याची परवानगी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली. इराण विश्वचषकातून बाहेर पडला तरीही उपस्थितीमुळे महिला स्वातंत्र्याचा विजय झाला.
सामन्यादरम्यान महिलांमधील उत्साह पाहण्यासारखा होता. अनेक महिलांनी गालावर राष्टÑध्वज रंगवून घेतला होता. या महिलांनी एक लाख क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये लाईव्ह स्क्रीनवर सामन्याचा आनंद लुटून विश्वचषकाची रोमहर्षकता आमच्यापर्यंत पोहोचली असल्याचे संकेत दिले. इराणमधील महिलांना १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर खेळाचे सामने स्टेडियममध्ये पाहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
पोर्तुगालविरुद्ध इराणचा खेळाडू अखेरच्या क्षणी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरताच महिलांच्या उत्साहावर विरजण पडले. इराणचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. आमचा संघ हरला पण या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अनेक वर्षे ताज्या राहतील, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली.
एक महिला म्हणाली,‘आॅनलाईन तिकीट खरेदी करणे अवघडल्यासारखे वाटत होते. पण स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे रोमहर्षक ठरले. उपस्थितांमधील उत्साह पाहून मी भारावलेच. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्कृष्ट प्रसंग ठरला.’
इराणने पहिल्या सामन्यात मोरोक्कोवर विजय नोंदविल्यानंतर हजारो चाहत्यांनी राजधानीतील रस्त्यांवर विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर स्टेडियम प्रेक्षकांसाठी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. या जल्लोषात महिलादेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. (वृत्तसंस्था)

Web Title: FIFA Football World Cup 2018: Thousands of Iranians have seen the World Cup match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.