FIFA Football World Cup 2018 : बारा वर्षांपूर्वी अन् याच दिवशी... सेम टू सेम !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 03:20 AM2018-07-02T03:20:22+5:302018-07-02T03:21:41+5:30
1 जुलै 2006 मध्ये अशाच एका संघासाठी गोलरक्षक हिरो ठरला होता आणि बरोबर 12 वर्षांनी त्याच दिवशी त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली.
मॉस्को - रशियात सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यात रविवारी गोलरक्षक डॅनिजेल सुबासिचने पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात तीन अप्रतिम बचाव करून क्रोएशियाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिऴवून दिला. क्रोएशियाने 3-2 ( 1-1) अशा फरकाने डेन्मार्कचे कडवे आव्हान परतवून लावले. 1998 नंतर क्रोएशियाची विश्वचषक स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या त्या स्पर्धेत पदार्पणात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता आणि त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचे लक्ष्य त्यांना खुणवत आहे. त्यांच्या मार्गात यजमान रशियाचे आव्हान असणार आहे.
Half way there...
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 1, 2018
Two quarter-finals decided, two to go, with this confirmed tonight 👇
Sat 7 July, 21:00
Russia vs Croatia 🇷🇺🇭🇷
Sochi#RUSCROpic.twitter.com/EQz4X33hu2
मात्र रविवारी सुबासिचची ही कामगिरी इतिहासाला उजाळा देणारी ठरली. पेनल्टी शूटआऊटमध्ये सुबासिचने डेन्मार्कच्या तीन खेळाडूंचे प्रयत्न अपयशी ठरवले. 1 जुलै 2006 मध्ये अशाच एका संघासाठी गोलरक्षक हिरो ठरला होता आणि बरोबर 12 वर्षांनी त्याच दिवशी त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली. असे काय घडले होते ते जाणून घेऊया...
On this day in 2006, #POR goalkeeper Ricardo became the first to save three penalties in a #WorldCup shoot-out as they beat #ENG in the quarter-finals.
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 1, 2018
Will today bring our first taste of penalty drama?
Get your latest dose of stats and more right here:https://t.co/asVL7g8f3cpic.twitter.com/IjMxFl0qlb
1 जुलै 2006 साली जर्मनीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगाल वि. इंग्लंड यांच्यातील ती लढत निर्धारित कालावधीत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल ताणला गेला. गोलरक्षक रिकार्डोने इंग्लंडच्या लॅम्पार्ड, गेरार्ड आणि कॅराघेर असे तीन प्रयत्न रोखून पोर्तुगालला 3-1 असा विजय मिळवून दिला होता. शूटआऊटमध्ये तीन बचाव करणारा तो पहिला गोलरक्षक ठरला होता आणि त्याच तारखेला सुबासिचने त्याच कामगिरीची बरोबरी केली.