FIFA Football World Cup 2018 : दोन वेळा विश्वचषका जिंकण्याऱ्या यादीत आता फ्रान्सही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 11:29 PM2018-07-15T23:29:51+5:302018-07-15T23:31:17+5:30
आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे ज्याने दोन वेळा विश्वचषक पटकावले.
ऑनलाईन वृत्तसंस्था : यंदाचा फिफा विश्वचषक पटकावत फ्रान्सने आणखी एक इतिहास रचला. विश्वचषक स्पर्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जिंकण्याच्या यादीत आता फ्रान्सचेही नावा जोडल्या गेले. आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे ज्याने दोन वेळा विश्वचषक पटकावले.
#FRA are the raining/reigning #WorldCup champions!
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
Sorry/not sorry about that pun. ☔️ pic.twitter.com/FAWosoP8lX
फिफा विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकण्याची किमया ब्राझीलने केली. त्यांनी १९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ मध्ये चषक पटकाविले. त्यानंतर जर्मनीचा क्रमांक लागतो. त्यांनी चार वेळा म्हणजे १९५४, १९७४, १९९० आणि २०१४ मध्ये स्पर्धा जिंकली होती. इटलीने सुद्धा चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. १९३४, १९३८, १९८२ आणि २००६ मध्ये त्यांनी चषकावर नाव कोरले आहे. उरुग्वेने १९३० आणि १९५० मध्ये चषक पटकाविला होता. इग्लंड (१९६६) आणि स्पेनने (२०१०) मात्र एकदाच ही स्पर्धा जिंकलेली आहे.