FIFA Football World Cup 2018 : क्रोएशियाच्या राष्ट्रपतींनी जेव्हा फुटबॉलपटूंबरोबर धरला ठेका... पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:16 PM2018-07-09T18:16:58+5:302018-07-09T18:18:28+5:30
कोलिंडा, या क्रोएशियाच्या राष्ट्रपती असल्या तरी सामना पाहताना त्या सामान्य व्यक्ती असतात. एखादा चाहता आपल्या संघाने गोल केल्यावर जसा आनंद व्यक्त करतो, तशाच त्यादेखील गोल झाल्यावर नाचत आनंद व्यक्त करतात.
मॉस्को : एखादा देश किती क्रीडाप्रेमी असू शकतो, याचं उत्तम उदाहरण ठरतंय ते क्रोएशिया. सध्याच्या घडीला क्रोएशियाचा संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. पण तो फक्त गुणवत्तेच्या जोरावरच असं नाही, कारण त्यांना पाठिंबाही तसाच मिळतोय. जर तुमच्या देशाचे राष्ट्रपती सामना पाहायला येत असतील, सामन्यादरम्यान तुम्हाला प्रोत्साहन देत असतील, सामना संपल्यावर मैदानात येऊन तुमचे कौतुक करत असतील, विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये तुमच्याबरोबर सेलिब्रेशन करत असतील, तर तुमच्या संघाचे मनोबल किती वाढत असेल. हेच घडतेय ते क्रोएशिया संघाबरोबर आणि हेच त्यांच्या यशाचे एक गमक आहे, असंही आपण म्हणू शकतो.
क्रोएशियाच्या राष्ट्रपती कोलिंडा ग्रेबर कित्रोव्हिक या विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी रशियामध्ये दाखल झाल्या आहेत. प्रोटोकॉलनुसार त्यांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षात जागा दिली होती. पण त्यांनी आपल्या देशवासियांबरोबर सामना पाहायला पसंती दिली. त्याचबरोबर सामना संपल्यावर त्यांनी क्रोएशियाच्या संघाबरोबर सेलिब्रेशन करताना ठुमकेही लगावले.
क्रोएशियाच्या राष्ट्रपतींनी संघाबरोबर जो डान्स केला, त्याचा हा व्हिडीओ पाहा...
This is so inspiring! #Croatia’s president celebrates with players after they beat #Russia and secured a place in #WorldCup semifinals ...
— shaimaa khalil BBC (@Shaimaakhalil) July 7, 2018
pic.twitter.com/E4AaAyN0hL
कोलिंडा, या क्रोएशियाच्या राष्ट्रपती असल्या तरी सामना पाहताना त्या सामान्य व्यक्ती असतात. एखादा चाहता आपल्या संघाने गोल केल्यावर जसा आनंद व्यक्त करतो, तशाच त्यादेखील गोल झाल्यावर नाचत आनंद व्यक्त करतात. एखादा राष्ट्रपती आपल्या एका संघासाठी सामान्य व्यक्तीसारखा वागू शकतो, असे आदर्शवत उदाहरण कोलिंडा यांनी आपल्या सर्वांपुढे ठेवले आहे.
सामना पाहताना आनंद व्यक्त करताना कोलिंडा
Russian PM Dmitry Medvedev (right) is not amused by the celebration by Croatian president Kolinda Grabar-Kitarović (left in red & white) #RUS#CRO#WorldCuppic.twitter.com/gn0K1FX6Sd
— Marcus Gilmer (@marcusgilmer) July 7, 2018