FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 19:27 IST2018-07-02T19:26:11+5:302018-07-02T19:27:22+5:30
ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का
मॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या फुटबॉल विश्वचषकातील सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
फ्रान्सने अर्जेंटीनाला पराभूत केल्यामुळे मेस्सी यापुढे आपल्याला विश्वचषकात दिसणार नाही. त्याचबरोबर उरुग्वेने पोर्तुगालला २-१ असे पराभूत केल्यामुळे रोनाल्डोचे विश्वविजयाचे स्वप्न भंगले आहे. पण नेमारकडे ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाण्याची संधी आहे. ब्राझीलने मेक्सिकोला पराभूत केले तर त्यांना उपांत्यपूर्व फेरीत पोहोचता येईल.
अशी असेल दोन्ही संघांची रणनीती
#BRAMEX // This is how they are shaping up in Samara...#WorldCuppic.twitter.com/LNwCYsrKTP
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) July 2, 2018