FIFA Football worldcup 2018: फुटबॉल विश्वचषकात ब्राझीलच अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 06:08 PM2018-07-03T18:08:13+5:302018-07-03T18:08:33+5:30
ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे.
मॉस्को - ब्राझीलने सोमवारी मेक्सिकोवर झकास विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ब्राझीलने दोन गोल लगावले होते. या दोन गोलसह ब्राझील विश्वचषकातील अव्वल संघ ठरला आहे.
ब्राझील आणि मेक्सिको या दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नव्हता. पण सामन्याचा 51व्या मिनिटाला नेमारने गोल करत ब्राझीलला खाते उघडून दिले. त्यानंतर दुसऱ्या गोलमध्येही नेमारने मोलाची भूमिका बजावली होती. या दोन गोलसह ब्राझीलने मेक्सिकोला 2-0 अशा फरकाने नमवले, पण त्याचबरोबर एक विक्रमही आपल्या नावावर केला.
मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यापूर्वी ब्राझील आणि जर्मनी यांची विश्वचषकात गोल बरोबरी होती. दोघांच्याही खात्यात 226 असे समान गोल होते. ब्राझीलने मेक्सिकोविरुध्दच्या सामन्यात दोन गोल लगावले आणि जर्मनीला मागे टाकत विश्वचषकतील सर्वाधिक गोलचा (२२८) विक्रम आपल्या नावावर केला.