फिफा परिषदेच्या बैठकीत पाकच्या निलंबनावर होणार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:44 AM2017-10-27T00:44:38+5:302017-10-27T00:44:48+5:30
कोलकाता : व्हिडिओ सहायक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञान लागू करणे आणि पाकिस्तानचे निलंबन निश्चित करणे अशा विषयांसह अनेक मुद्यांवर शुक्रवारी होत असलेल्या फिफा परिषदचेच्या बैठकीत चर्चा होईल.
कोलकाता : व्हिडीओ सहायक पंच (व्हीएआर) तंत्रज्ञान लागू करणे आणि पाकिस्तानचे निलंबन निश्चित करणे अशा विषयांसह अनेक मुद्यांवर शुक्रवारी होत असलेल्या फिफा परिषदेच्या बैठकीत चर्चा होईल. या वेळी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यजमान देशाचे विशेष निमंत्रित सदस्य या नात्याने फिफा परिषदेला संबोधित करतील.
विशेष म्हणजे या वेळी पटेल २०१९ मध्ये होत असलेल्या २० वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठीही भारताच्या वतीने दावेदारी सादर करतील. त्याचबरोबर २०२० आणि २०२१ मध्ये होणा-या फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत इच्छुक असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही बैठक भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे.
या बैठकीमध्ये २०२६च्या विश्वचषक बोली प्रक्रियेवरही चर्चा होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे पहिल्यांदाच फिफाची बैठक ज्यूरिख येथील कार्यालयाऐवजी १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान बाहेर होत आहे. दरम्यान, या बैठकीतील मुख्य मुद्दा व्हीएआर तंत्र लागू करण्याचा असेल.