FIFA World Cup 2018 : रशियामधील फुटबॉल विश्वचषकावर सायबर हल्ल्याचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 01:55 PM2018-06-07T13:55:39+5:302018-06-07T13:55:39+5:30
ब्राझीलमध्ये जेव्हा 2016 साली ऑलिम्पिक भरवण्यात आले होते, तेव्हा रशियाने जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेच्या संगणकांवर रशियाने सायबर हल्ला केला होता.
मॉस्को : फुटबॉल चाहत्यांचा कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. फुटबॉल विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी तुम्हा सारे चाहते आसूसलेले असाल. महिनाभर तुम्ही रशियामध्ये राहून फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटायचा प्लॅन करत असाल, तर सावधान. कारण फुटबॉल विश्वचषकादरम्यान सायबर हल्ल्याचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
रशियाबरोबर बऱ्याच देशांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. सायबर हल्ल्यांबाबत रशियाचे नाव काळ्या यादीत आहे. कारण ब्राझीलमध्ये जेव्हा 2016 साली ऑलिम्पिक भरवण्यात आले होते, तेव्हा रशियाने जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेच्या संगणकांवर रशियाने सायबर हल्ला केला होता. रशियाने हा हल्ला केल्याचे सिद्धही झाले होते.
सध्याच्या घडीला रशियामध्ये एवढी मोठी स्पर्धा होत असताना त्यांचे शत्रू राष्ट्र आता सायबर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहेत. रशियातील प्रत्येक व्यक्तीवर पाहणी करण्यासाठी काही देश सक्रीय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रशियामध्ये जाणाऱ्या चाहत्यांनी जपून रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.