FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 11:34 PM2018-06-16T23:34:22+5:302018-06-16T23:39:36+5:30

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 7व्या सामन्यात डेन्मॉर्कच्या संघानं अटीतटीच्या लढतीत पेरूला 1-0नं हरवून शानदार विजयी आघाडी मिळवली.

FIFA World Cup 2018: Denmark beat Peru 1-0 | FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय 

FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय 

Next

सरान्स्क- फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 7व्या सामन्यात डेन्मॉर्कच्या संघानं अटीतटीच्या लढतीत पेरूला 1-0नं हरवून शानदार विजयी आघाडी मिळवली. युसुफ युरारे पोल्सन याने 59व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर डेन्मार्कने 36 वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणा-या पेरूवर 1-0 असा विजय मिळवला. पेरूच्या क्रिस्टन क्युएवाने पेनल्टीवर गोल करण्याची संधी दवडली. त्यासोबतच गोल करण्याच्या संधी गमावल्याने पेरूला पराभवाचा धक्का बसला
सामन्याच्या 44व्या मिनटाला डेन्मार्कचा फॉरवर्ड युरारे याने पेरूच्या क्युएवा याला बॉक्समध्ये पाडले. त्यात व्हिडीओ सहायक रेफरीच्या
माध्यमातून त्याला पेनल्टी मिळाली. पेरुला मिळालेली ही पेनल्टी क्युएवा याने घेतली, आणि अर्जेंटिनाच्या मेस्सी पाठोपाठ दिवसभरातील दुसरी पेनल्टी वाया घालवली. क्युएवाने मारलेला शॉट क्रॉस बारच्या खुप वरून गेला. पहिला हाफ ०-० अशा बरोबरी संपला. त्यानंतर  त्यात पेरूने आठ वेळा डेन्मार्कच्या गोलपोस्टवर हल्ले केले होते. मात्र पेरूचे नशीब एकदाही फळफळले नाही. दुस-या हाफमध्ये डेन्मार्कच्या युसुफ युरारे याने 59व्या मिनिटाला ख्रिस्तियन एरिक्सनच्या पासवर पेरूच्या गोल रक्षकाला चकवत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. आणि डेन्मार्कने 1-0अशी आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकून राहिली.

या सामन्यात सर्वात जास्त चर्चा राहिली ती क्युएवाने पेनल्टीची संधी दवडल्याची. आजच्या दिवसातील वाया गेलेली ही दुसरी पेनल्टी होती. या आधीच्या सामन्यात मेस्सीने आईसलॅण्ड विरोधात पेनल्टीवर गोलची संधी दवडली. 2014च्या विश्वचषकात निर्धारीत वेळेत पेनल्टीवर गोल करण्याची एकच संधी गमावली होती. तर आजच्या दिवसात दोन वेळा हा प्रकार झाला. आजच्या विजयी गोलसाठी पास दिलेला डेन्मार्कच्या ख्रिस्तियन एरिक्सन याने 14 सामन्यात डेन्मार्कसाठी 17 गोलचे योगदान दिले. त्याने या पैकी 12 गोल स्वत: केले आहेत. तर पाच गोलसाठी त्याचा पास महत्त्वाचा ठरला.

Web Title: FIFA World Cup 2018: Denmark beat Peru 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.