FIFA World Cup 2018 : इजिप्तच्या विजयाची पाटी कोरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 08:12 PM2018-06-15T20:12:05+5:302018-06-15T20:12:05+5:30
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामन्यात इजिप्तने शुक्रवारी उरुग्वेला पूर्णवेळ बरोबरीत रोखल्यावर शेवटच्या काही क्षणांमध्ये गमावला.
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘अ’ गटातील सामन्यात इजिप्तने शुक्रवारी उरुग्वेला पूर्णवेळ बरोबरीत रोखल्यावर शेवटच्या काही क्षणांमध्ये गमावला. जोस गिमिनेझच्या गोलने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. यासह इजिप्तची विश्वचषकात पाच सामन्यानंतरही विजयाची पाटी कोरीच राहिली आहे.
The @Budweiser#ManoftheMatch for #EGYURU is @Pharaohs' @Melshenawy! pic.twitter.com/2Bg0zZhKpb
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 15, 2018
इजिप्तचा संघ तिसºयांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळत असला तरी त्यांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.१९९० नंतर प्रथमच विश्वचषक फुटबॉलसाठी पात्र ठरलेल्या इजिप्तचा हा पाचवा सामना होता.या पाच सामन्यात आता तीन पराभव आणि दोन बरोबरी त्यांच्या नावावर आहे. कोणत्याही आफ्रिकी देशासाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजयासाठी ही सर्वात प्रदीर्घ प्रतिक्षा आहे.