FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:32 AM2018-06-19T01:32:12+5:302018-06-19T01:44:36+5:30

फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघानं जी गटातील सामन्यात ट्युनिशियाला पराभवाची धूळ चारली आहे.

FIFA World Cup 2018: England defeats Tunisia 2-1 | FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव

FIFA World Cup 2018: इंग्लंडकडून ट्युनिशियाचा 2-1नं पराभव

Next

वोल्गोग्राड- इन्जुरी टाईममध्ये बदली खेळाडू मॅगवायरच्या कोप-यातून दिलेल्या पासवर हेडरद्वारे गोल नोंदवून हॅरी केन याने इंग्लंडला ट्युनिशियाविरुद्ध फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात 2-1ने विजय मिळवून दिला. केनने या सामन्यात 11व्या आणि 91व्या मिनिटाला गोल केले. सकारात्मक आणि आक्रमकपणे खेळ करणा-या ट्युनिशियाने इंग्लंडच्या खेळाडूंना वारंवार रोखले, पण मोक्याच्या क्षणी अनुभव कमी पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मध्यंतरापर्यंत उभय संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यात इंग्लंडकडून 11व्या मिनिटाला स्ट्रायकर हॅरी केन याने रिबाऊंडवर गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. तथापि 35व्या मिनिटाला इंग्लंडचा खेळाडू वॉकर याने केलेल्या चुकीमुळे ट्युनिशियाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर मिडफिल्डर फर्जानी आसी याने गोल करून सामना बरोबरीत आणला होता.
इंग्लंडकडून बरोबर 20 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 सालच्या विश्वचषकात 2-0 असा पराभव पत्करावा लागल्याची बोच मनात असलेला टयुनिशियाचा संघ इंग्लंडच्या युवा संघावर मात करून त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळला. पारंपरिक युरोपियन शैलीत खेळणारा इंग्लंड संघ आणि आफ्रिकेच्या सहारा वाळवंटानजीक असलेल्या ट्युनिशियाचा राकट संघ असा हा सामना रंगला. फुटबॉल शौकिनांचेही लढतीवर जवळून लक्ष होते. पण या सामन्यात इंग्लंडनेच बाजी मारली.

Web Title: FIFA World Cup 2018: England defeats Tunisia 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.