FIFA World Cup 2018 : फुटबॉल विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, इसिसनं पूर्ण स्टेडियम उडवण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:07 PM2018-06-14T22:07:45+5:302018-06-14T22:07:45+5:30
दहशतवादी संघटना इसिसनं हल्लासंदर्भातील पोस्टरही व्हायरल केले आहेत.
मॉस्को- रशियामध्ये सुरू झालेल्या 21व्या फिफा फुटबॉल विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. अनेक दहशतवादी संघटनांनी वर्ल्ड कप सामन्याच्या वेळी दहशतवादी हल्ला करण्याची योजना बनवली आहे. याचदरम्यान दहशतवादी संघटना इसिसनं हल्लासंदर्भातील पोस्टरही व्हायरल केले आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, या पोस्टर्समध्ये फुटबॉल सामन्याचं यजमानपद करणा-या स्टेडियमला दहशतवाद्यांनी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच स्टेडियम बॉम्बस्फोटानं उडवत असलेले पोस्टरही इसिसनं व्हायरल केले आहेत. तर एका पोस्टरमध्ये हे कट्टरवादी दहशतवादी चाकूनं फिफा पाहणा-या लोकांना चिरताना दाखवण्यात आले आहेत. या पोस्टरमधून दुस-याच एका स्टेडियमलाही टार्गेट करण्यात आलं आहे. तर दुस-या एका पोस्टरमध्ये दहशतवाद्यांच्या हातात मशीनगन असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यात दहशतवाद लवकरच सुरू होईल, असंही दाखवण्यात आलं आहे.
जगभरात फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतील सामन्यांचा फुटबॉल प्रेमी चाहते मजा घेत आहेत. ज्याची सुरुवात आजपासून 14 जूनपासून झाली आहे. फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. 32 संघांचं 8 वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेत दहशतवादाशी निपटण्यासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज आहे. रशिया वायू सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली असून, येणा-या प्रेक्षकांचीची कसून चौकशी सुरू आहे.