FIFA World Cup 2018: क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत, कसं ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 06:35 PM2018-06-07T18:35:21+5:302018-06-07T19:10:44+5:30
भारतामध्ये क्रिकेटचे वेड सर्वाधिक आहे. पण तरीही क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत आहे, कसं ते पाहा
नवी दिल्ली : भारतामध्ये क्रिकेट हा धर्म असल्याचे काही जणं समजतात. भारतामध्ये क्रिकेटचे वेड सर्वाधिक आहे. पण तरीही क्रिकेटपेक्षा फुटबॉल श्रीमंत आहे, कसं ते पाहा
रशियामध्ये काही दिवसांमध्ये फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होत आहे. हा विश्वचषक 14 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता रशियात होणाऱ्या फुटबॉलच्या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी बरेच चाहते रवानाही झाले आहेत. क्रिकेटच्या विश्वचषकालाही चाहत्यांचा भरघोस प्रतिसाग मिळतो, पण क्रिकेटपेक्षा फुटबॉल हा श्रीमंत खेळ आहे. कारण क्रिकेटपेक्षा फुटबॉल विश्वचषकात जास्त बक्षिस रक्कम दिली जाते, ही रक्कम तब्बल 80 पटीने जास्त आहे.
क्रिकेटचा विश्वचषक 2015 साली झाला होता. त्यावेळी एकूण 68 कोटी 54 लाख रुपयांची एकूण बक्षिसं दिली गेली होती. पण फुटबॉलच्या विश्वचषकातील विजेत्यालाच 225 कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. क्रिकेट विश्वचषकातील विजेत्याला 3 कोटी रुपये दिले गेले होते.