Fifa World Cup 2018 : फुटबॉल ‘प्रस्थापितांना’ धक्का देणाऱ्या संघांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 07:47 AM2018-06-14T07:47:34+5:302018-06-14T07:47:34+5:30

आईसलॅण्ड व पनामा पहल्यिांदाच स्पर्धेत खेळत आहेत. त्यातही आईसलॅण्डचा खेळ औत्सुक्याचा ठरणार आहे.

Fifa World Cup 2018: The History of Conflicting Soccer 'Installers' panama and Iceland | Fifa World Cup 2018 : फुटबॉल ‘प्रस्थापितांना’ धक्का देणाऱ्या संघांचा इतिहास

Fifa World Cup 2018 : फुटबॉल ‘प्रस्थापितांना’ धक्का देणाऱ्या संघांचा इतिहास

googlenewsNext

चिन्मय काळे
मुंबई -  फिफा विश्वचषकाच्या किक-आॅफ ला अवघे काही तास शिल्लक आहेत. सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष स्वाभाविकच जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटीना, पोर्तुगाल, इंग्लंड या संभाव्य विजेत्यांकडे लागले असले तरी बलाढ्य संघांना अनपेक्षित धक्के देण्याची ताकद छोट्या संघांमध्ये आहे, हे विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासात दिसून आले आहे. खास म्हणजे, पहिल्यांदाच विश्वचषकाच्या रणधुमाळीत उतरणा-या संघांनीही मातब्बर व प्रस्थापित संघांना धक्के दिल्याचा इतिहास आहे. यंदा आईसलॅण्ड व पनामा पहल्यिांदाच स्पर्धेत खेळत आहेत. त्यातही आईसलॅण्डचा खेळ औत्सुक्याचा ठरणार आहे.

क्रोएशियाने रचला होता इतिहास
बलाढ्य संघांना नमवत फुटबॉल विश्वाला सर्वात मोठा धक्का आजवर क्रोएशियाने दिला आहे. क्रोएशिया देशाची निर्मिती मूळ युगोस्लाव्हिया या देशातून झाली. १९९६-९७ दरम्यान हा देश वेगळा झाला. त्यानंतर लगेचच १९९८ मध्ये विश्वचषक स्पर्धा होती. देशांतर्गत युद्ध परिस्थितीचा सामना करीत या देशाचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेसाठी पात्र झाला. पण त्यामध्ये क्रोएशियाने दाखविलेली चमक चर्चेचा विषय ठरली. क्रोएशियाने साखळी फेरीत गटात दुसरे स्थान पटकावत दुसरी फेरी गाठली. दुसºया फेरीत रुमानियासारख्या अनुभवी संघाला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. फुटबॉल विश्वाला सर्वात मोठा धक्का त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीला नमवत दिला. जर्गन क्लिन्समनसारख्या अनुभवी खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणाºया जर्मन संघावर क्रोएशियाने ३-० ने जबरदस्त विजय मिळवला. पुढे उपांत्य फेरीत फ्रान्सने त्यांचा पराभव केला तरी क्रोएशियाचे जगभर कौतूक झाले. संघाचा ‘स्टार’ खेळाडू डेव्हॉर सुकरचा स्पर्धेतील सर्वाधिक गोल स्कोररही ठरला होता.

‘तुर्की’ची जोरदार धडक
तुर्कीचा संघ १९५४ साली पात्र झाला होता. पण पहिल्याच फेरीत गारद झाला. त्यानंतर संघ २००२ पर्यंत एकाही विश्वचषकात पात्र झाला नाही. २००२ च्या विश्वचषकात तुर्कीच्या संघाने चमकदार कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्यांचा ब्राझीलकडून निसटता पराभव झाला. पण दक्षिण कोरियाला नमवत संघाने तिसरे स्थान पटकावले. त्याच स्पर्धेत दक्षिण कोरियानेसुद्धा इटलीसारख्या मातब्बर संघाला हरवत जगाचे लक्ष स्वत:कडे ओढले होते.

पोर्तुगालचा ब्राझीलला धक्का
आज सर्वाधिक चर्चेत असलेल्या पोर्तुगालने १९६६ मध्ये चक्क ब्राझीलला धक्का दिला होता. पहिल्यांदाच विश्वचषकात खेळत असतानाही पोर्तुगालने ३-० असा जोरदार विजय मिळवत ब्राझीलला साखळी फेरीतच गारद केले होते. त्या स्पर्धेत पोर्तुगालने तिसरे स्थान पटकावले होते.

आईसलॅण्ड धक्का देणार!
छोटा संघ असतानाही बलाढ्यांना धक्का देण्याची परंपरा यंदा आईसलॅण्डचा संघ कायम ठेवण्याची शक्यता आहे. विश्वचषकाआधी २०१६ मध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेत हा संघ पहिल्यांदाच खेळला. इंग्लंडला नमवून संघाने त्या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली होती. तसाच धक्का आता विश्वचषकातही देण्यास संघ सज्ज आहे. आईसलॅण्ड हा विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक चुरशीच्या ‘ड’ गटात आहे. अर्जेंटीना, नायजेरिया आणि क्रोएशिया या अन्य मातब्बर संघांचा त्यात समावेश आहे. आईसलॅण्ड प्रसंगी अर्जेंटीनादेखील धक्का देऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

१९९८ पासून विश्वचषकात ३२ संघ पात्र होत आहेत. त्याआधी हा आकडा २४ व सुरूवातीला १६ च होता. ३२ संघांच्या स्पर्धेत तुर्की आणि क्रोएशियाखेरीज पहिल्यांदाच पात्र होणाºया संघात स्लोव्हाकियाने इटलीला नमवून २०१० च्या विश्वचषकात अंतिम १६ संघात स्थान मिळवले होते. तर त्याआधी युक्रेनने स्वीत्झर्लंडचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. विश्वचषकात पहिल्यांदाच खेळताना कमी संघांच्या स्पर्धेत क्युबा व वेल्सने १९५८ मध्ये तर उत्तर कोरियाने १९६६ मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

Web Title: Fifa World Cup 2018: The History of Conflicting Soccer 'Installers' panama and Iceland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.