FIFA World Cup 2018 : उरुगवेच्या छातीवर इतिहासाचे भूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 05:15 PM2018-06-15T17:15:22+5:302018-06-15T17:15:22+5:30
सलामीच्या सामन्यात उरुगवेचे पारडं जड, पण परंपरेची भीती
चिन्मय काळे : फुटबॉल विश्वचषकाचा एक दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या उरुगवेचे अ गटातील त्यांच्या पहिल्या सामन्यात ईजिप्त विरुद्ध पारडे जड आहे. पण सामना पहिला असल्यानेच जुन्या परंपरेचे भूत त्यांच्या छातीवर आहे.
पहिला विश्वचषक जिंकनाऱ्या उरुगवे च्या संघाची कामगिरी 1970 नंतर ढेपाळली. पण 2010 च्या स्पर्धेत संघाने उपांत्य फेरीत अनपेक्षित धडक मारली. वास्तवात 2006 नन्तरच ऑस्कर तबरेझ या अनुभवी प्रशिक्षकांनी संघ सक्षम केला आहे. संघातील लुईझ सआरेझ, एडिल्सन कॅविनी हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंपीएकी एक आहेत. सुआरेझ ला 2010 च्या स्पर्धेतील उपांत्य फेरी पर्यंतचा तगडा अनुभव आहे.
दुसरीकडे इजिप्त मात्र त्या तुलनेत खूपच कमकुवत आहे. त्याची ही फक्त तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे. आजवर स्पर्धेतील त्यांचा खेळ सुमारच राहीला आहे. पण अर्जेन्टिनाचे माजी खेळाडू हेकटर कूपर हे संघाचे प्रशिक्षक आहेत. तसेच लिव्हरपूल सारख्या मातब्बर क्लब कडून खेळणारा मोहंमद सलाहा हे इजिप्त च्या संघासाठी जमेच्या बाजू आहेत. त्यातून सलाहा जखमी होता. पण तो आता तंदुरुस्त असून सामना खेळणार असल्याचे सांगण्यात आल्याने इजिप्तशिअन्स चे मनोबल वाढले आहे.
हा सामना उरुगवे साठी प्रतिष्ठेचा असेल. याआधीच्या विश्वचषकात सलामीच्या सामन्यात उरुगवे तीन वेळा पराभूत झालाय. तर तीन वेळा सामना अनिर्णित सुटला आहे. त्यातून अ गटाच्या पहिल्या सामान्यातच रशियाने काल दाखवलेला झंझावात पाहता उरुगवे ला या सामन्यात विजय अत्यावश्यक असेल. त्यामुळे इजिप्त तुलनेने दुबळा असला तरी खरा दबाव उरुगवे वर आहे. सामन्याचे अंदाज वर्तविणार्यांनी 56 टक्के विजय उरुगव च्या परड्यात घातलाय. 30 टक्के सामना अनिर्णित राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. कॅविनी आणि सुआरेझ चा सामना करण्यासाठी इजिप्त 4-2-3-1 आशा आगळ्या रचनेत खेळण्याची शक्यता आहे. इजिप्त चा गेम डिफेनसिव्ह असेल