FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 11:21 PM2018-06-17T23:21:35+5:302018-06-18T03:40:49+5:30

इर्विग लोजाना याच्या एका गोलच्या बळावर मॅक्सिकोनं जर्मनीवर 1-0नं मात केली.

FIFA World Cup 2018 - Maxicon gains Germany to win 1-0 | FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी

FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी

Next

मॉस्को : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने ‘फ’ गटाच्या पहिल्याच सामन्यात १ -० ने पराभूत करून खळबळ उडवून दिली. हिरविंग लुझानो याने ३५व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने बलाढ्य जर्मनीवर हा विजय मिळवला. गेल्या विश्वचषकातही गतविजेत्यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
हा सामना लुझियानी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात थॉमस म्युलरच्या नेतृत्वात जर्मनीने काहीसा दिशाहीन खेळ केला. सुरूवातीला मिळालेल्या संधीवर जर्मनीला यश मिळवता आले नाही. मेक्सिकोने जोरदार प्रतिआक्रमण करत गोल केला. ३५ व्या मिनिटाला लुझानो याने जर्मनीचा गोलकिपर मॅन्युअल नेअर याला चकवा देत बॉलला गोलजाळ््यात पाठवले. त्याच्या कारकिर्दीतील हा आठवा गोल होता. लुझानोच्या या गोलनंतर लगेचच एका मिनिटात जर्मनीला फ्री कीक मिळाली होती. मात्र त्यावर जर्मनीच्या संघाला बरोबरी साधता आला नाही.
गतविजेत्या जर्मनीच्या संघाने पहिल्या हाफमध्ये जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर तब्बल १० वेळा हल्ले केले. यावेळी मेक्सिकोला ही लढत कठीण जाणार असेच चित्र होते. मात्र, नंतर मेक्सिकोने मोक्याच्यावेळी संधी साधताना चित्र पालटले. जर्मनीने या आधी १९९४ मध्ये विश्वचषकात कोरियाच्याविरुद्ध पहिल्या हाफमध्ये आक्रमक खेळ करताना १० हल्ले केले होते. 
>मेक्सिकोच भक्कम बचाव
या सामन्यात जर्मनीने एकुण २५ वेळा मेक्सिकोच्या गोलपोस्टवर आक्रमण केले मात्र दिशाहीन शॉट आणि मेक्सिकोच्या गुईलिमिरो ओईचा याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे जर्मनीच्या बलाढ्य संघाला गोल नोंदवता आला नाही.
अतिरिक्त वेळेत गोलरक्षक नेअर सहीत जर्मनीचे सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मेक्सिकोवर आक्रमण करत होते. मात्र मेक्सिकोच्या बचाव फळीने आपली अभेद्यता कायम राखली.
विश्वचषकात पहिल्याच सामन्यात पराभूत होणारा जर्मनी हा पहिला गतविजेता संघ नाही. या आधीच्या स्पर्धात स्पेन, फ्रान्स आणि अर्जेंटिना हे गतविजेते पराभूत झाले होते.

Web Title: FIFA World Cup 2018 - Maxicon gains Germany to win 1-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.