Fifa football World Cup 2018 :  तर्क-वितर्कांना चपराक, विश्वचषकातील हे विक्रम तुम्हाला अचंबित करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:10 PM2018-07-11T17:10:04+5:302018-07-11T17:10:21+5:30

यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली.

Fifa World Cup 2018: This Record in the World Cup will surprise you | Fifa football World Cup 2018 :  तर्क-वितर्कांना चपराक, विश्वचषकातील हे विक्रम तुम्हाला अचंबित करतील

Fifa football World Cup 2018 :  तर्क-वितर्कांना चपराक, विश्वचषकातील हे विक्रम तुम्हाला अचंबित करतील

Next

पणजी -  यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ज्या स्टार खेळाडूंवर नजरा होत्या ते मागेच पडले. नव्या चेहºयांनी कमाल केली. अंडरडॉग संघांनी धक्कादायक निकाल दिलेत. काही नाट्यमय घडामोडी घडल्या. आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच विश्वविजेता ठरेल. त्यापूर्वी आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील घडामोडींची ही आकडेमय झलक पाहूयात..


१) एकूण सामने -६४, आतापर्यंतचे सामने ६२. उर्वरित सामने ०२
२) टॉप स्कोअरर : हेरी केन (इग्लंड)-६ गोल 
                           रोमेलू लुकाकू (बेल्जियम) ४ गोल
                           डेनिस चेरीशेव (रशिया) ४ गोल
३) एकूण गोल : १५८
     येलो कार्ड-२१०
     रेड कार्ड -०४
     पासेस कम्लिटेड- ४७०३१
     प्रत्येक सामन्याचा सरासरी गोल- २.६
     प्रत्येक सामन्याचा सरासरी येलो कार्ड-३.५
    - स्कोअर टीम- बेल्जियम -१४ गोल
   - बेस्ट अटॅकिंग टीम- ब्राझील-२९२
   - बेस्ट पासिंग-स्पेन- ३१२० पासेस
   - बेस्ट डिफेंडिग- २५९ वेळ ट्रकल

     ४) सर्वाधिक गोल संधी (मोस्ट अटेम्प्स)
     - नेमार (ब्राझील)-२७ वेळा 
    - सर्वाधिक डिफेन्स एरिया- रोमन झोबिनन-रशिया -६२ किमी
     - सर्वाधिक बचाव-गिल्मोय ओचाए (मेक्सिको)-२५ वेळा 
     - दोन हॅटट्रीक : हेरी केन (इंग्लंड), रोनाल्डो (पोतुर्गाल) 
पेनल्टीबाबत..
आतापर्यत २८ वेळा पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यात २१ वेळा पेनल्टीचे रुपांतर गोलमध्ये झाले. ७५ टक्के पेनल्टी यशस्वी झाल्या. ७ पेनल्टीचा बचाव करण्यात आला.
सर्वाधिक गोलचा सामना
बेल्जियम-ट्यनिशिया. या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ७ गोल नोंदवण्यात आले. याच सामन्यात ३१ वेळा गोल नोंदवण्याचा सर्वाधिक वेळा प्रयत्न झाला. जो यंदाच्या विश्वचषकातील एक विक्रम आहे.
स्वयंगोलचा विक्रम
यंदाच्या विश्वचषकात स्वयंगोलचा विक्रमही नोंदल्या गेला. ११ गोलमुळे हा विश्वचषकात चर्चेत असेल. कारण १९९८ मधील सहा स्वयंगोलचा विक्रम यंदा मोडल्या गेला.
२० वेळा विश्वचषका खेळण्याचा पराक्रम ब्राझीलच्या नावावर आहे.१९३० पासून ब्राझीलने विश्वचषकात एन्ट्री केली होती. त्यात ते पाच वेळा जिंकले आहेत. त्यानंतर जर्मनी आणि इटली यांचा नंबर लागतो.हे दोन्ही संघ १८ वेळा विश्वचषक खेळले आहे.  

संकलन-  सचिन कोरडे
 

Web Title: Fifa World Cup 2018: This Record in the World Cup will surprise you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.