FIFA World Cup 2018 : रशियाचा दणदणीत विजयारंभ; सौदी अरेबियावर 5-0 अशी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 10:44 PM2018-06-14T22:44:26+5:302018-06-14T23:24:24+5:30
आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियाने ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.
मॉस्को : यजमान रशियाने सलामीच्याच लढतीत दणदणीत विजयारंभ केला. रशियाने पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा सफाईदार विजय मिळवत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियाने ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. त्याचबरोबर रशियाचा विश्वचषकातील हा सर्वोत्तम विजय ठरला आहे.
सामन्याच्या सुरुवातीची 10 मिनिटे सौदी अरेबियाने दमदार खेळ केला. पण सामन्याच्या 12व्या मिनिटाला युरी गॉसिन्सकीने रशियासाठी पहिला गोल केला. आतापर्यंत सहा सामने खेळलेल्या गॉसिन्सकीला आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल करण्यासाठी व्यासपीठ मिळाले ते विश्वचषकाचे. गॉसिन्सकीने रशियाला गोलबोहनी करून दिली.
The 2018 FIFA #WorldCup is currently averaging five goals per game!
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 14, 2018
The perfect start for @TeamRussia!#RUSKSA#RUS#KSApic.twitter.com/jPPUiycsJD
सामन्याच्या 43व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवने रशियासाठी दुसरा गोल केला. डेनिसने मैदानात उतरल्यावर 89व्या सेकंदालाच हा गोल केला. राखीव खेळाडूने विश्वचषकात केलेला हा 2002 सालानंतरचा सर्वात जलद गोल ठरला. त्याचबरोबर विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत गोल करणारा डेनिस हा पहिला राखीव खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या 91 व्या मिनिटालाही डेनिसने अजून एक गोल करत संघाची आघाडी वाढवली. रशियाच्या आट्रेम डीयुबा आणि गोलोव्हिन यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.