FIFA World Cup 2018: सुरक्षा तज्ज्ञांनी केले आयोजकांना सावधविश्वचषकाला इसिसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:37 PM2018-06-07T23:37:48+5:302018-06-07T23:37:48+5:30

रशियात पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यान इस्लामिक स्टेट(इसिस) घातपात घडवू शकते, असा सावधतेचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.

FIFA World Cup 2018: Security experts have warned the organizers of the risk to warn them | FIFA World Cup 2018: सुरक्षा तज्ज्ञांनी केले आयोजकांना सावधविश्वचषकाला इसिसचा धोका

FIFA World Cup 2018: सुरक्षा तज्ज्ञांनी केले आयोजकांना सावधविश्वचषकाला इसिसचा धोका

Next

पॅरिस : रशियात पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकादरम्यान इस्लामिक स्टेट(इसिस) घातपात घडवू शकते, असा सावधतेचा इशारा सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
मागच्या वर्षी सोशल मीडियावर खेळाडूंना विचलित करणारे फोटो पोस्ट करण्यात आले होते. तेव्हापासूनच विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
इसिसचा प्रचार करणाऱ्या वाफा मीडिया फाऊंडेशनने सुपरस्टार लियोनेल मेस्सी आणि नेमार यांना काही व्हिडीओ पोस्ट केले. त्यांच्या गळ्यावर चाकू लावण्यात आल्याचे चित्रात दिसत असल्याने स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
‘जोवर आम्ही मुस्लीम देशात वास्तव्यास आहोत तोवर तुम्ही सुरक्षित राहू शकणार नाही,’ असा संदेशही पोस्ट करण्यात आला होता. वेस्ट पॉर्इंटच्या कॉम्बेटिंग टेरेरिझम सेंटरच्या(सीटीसी) मागच्या महिन्यात प्रकाशित अहवालात लेखक ब्रायन विलियम्स आणि रॉबर्ट सुझा यांनी विश्वचषकावर असलेल्या धोक्यासंदर्भात लिहिले,‘मागील काही वर्षांत रशियात अनेक दहशतवादी हल्ले झाले. इसिसशी जुळलेल्या अनेक दहशतवादी कारवाया हाणून पाडण्यात आल्या. यावरून इसिसकडे विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ले करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध होते.’ (वृत्तसंस्था)

सिरिया ठरेल कारण?
- वॉशिंग्टन सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅन्ड इंटरनॅशनल स्टडीजनुसार रशिया आणि माजी सोव्हिएत मध्य आशियातील जवळपास ८५०० जिहादी इसिस तसेच अन्य जिहादी समूहाशी जुळले आहेत.
दुसरीकडे फ्रेंच इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक अफेअर्सचे संचालक पास्कल बोनीफेस यांच्यानुसार,‘दहशतवादी हल्ल्याचा धोका आता सर्वच आंतरराष्टÑीय आयोजनाला असतो.
या स्पर्धा दहशतवाद्यांसाठी पर्वणी असतात. सिरियात रशियाने केलेला हस्तक्षेप हे भावी हल्ल्याचे कारण ठरू शकेल. हे कारण सोडले तरीही दहशतवादाचा धोका जगभर कायम आहेच.’

Web Title: FIFA World Cup 2018: Security experts have warned the organizers of the risk to warn them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.