FIFA World Cup 2018 : महाकुंभातील छोट्या देशाची ‘दास्तान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:04 PM2018-06-14T14:04:36+5:302018-06-14T14:04:36+5:30
फुटबॉल या खेळातून आपल्या देशाची ताकद दाखवण्याची संधी विश्वचषकातून मिळते.
सचिन कोरडे
फुटबॉल या खेळातून आपल्या देशाची ताकद दाखवण्याची संधी विश्वचषकातून मिळते. मग तो देश लोकसंख्येने किती का लहान असेना. आईसलँड हा उत्तर अटलांटात वसलेला एक छोटा देश आहे. याची लोकसंख्या ही इतकी असेल जितकी आपल्या देशाच्या एका प्रदेशाची. येथे केवळ ३ लाख ५० हजार लोक राहतात. या छोट्या देशाने विश्वचषकासाठी पात्र मिळवली आणि म्हणून त्याचा उल्लेख करणे गरजेचे आहे. यंदा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला हा सर्वात छोटा देश आहे.
याचप्रमाणे मध्य अमेरिकेत असलेला पनामाही आहे. आपल्या क्षेत्रात तिसरे स्थान मिळवत पनामाने पहिल्यांदा पात्रता मिळवली. पनामाची लोकसंख्या ४० लाख आहे. ट्युनिशिया, सर्बिया, कोस्तारिका, सेनेगल, पेरु, क्रोएशिया आणि उरुग्वे यासारख्या छोट्या देशांनी पात्रता मिळवली. उरुग्वेची लोकसंख्या केवळ ३२ लाख आहे. हा देश फुटबॉमधील एक मोठी ताकद बनू पाहत आहे. १३ वेळा विश्वचषक खेळूनदोन वेळा चॅम्पियन बननण्याचा मानही उरुग्वेने मिळवला आहे.
उरुग्वेनंतर आणखी एका छोट्या देशाने धमाल केली ती उत्तर आयलँडने. या देशाने १९५८ मध्ये विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. त्यांनी चेकोस्लोवाकियाचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीतही प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी १९८२ आणि १९८६ मध्ये विश्वचषक खेळला. जमैका आणि त्रिनिदाद १९९८ मध्ये आणि टोबॅगोने २००६ मध्ये विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. या सर्व देशांची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कमी आहे. तुलनेत चीन आणि भारत सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत. मात्र फुटबॉलमध्ये ते मागेच पडले. चीनने २००२ मध्ये पात्रता मिळवली होती. तर भारताने अजूनही विश्वचषकासाठी पात्रता मिळवलेली नाही.