Fifa World Cup 2018 : स्पेनच्या दिग्गजांकडे छाप सोडण्याची अखेरची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:56 AM2018-06-12T01:56:35+5:302018-06-12T01:56:35+5:30

प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील.

Fifa World Cup 2018 :  Spanish giants have the last chance to leave their mark | Fifa World Cup 2018 : स्पेनच्या दिग्गजांकडे छाप सोडण्याची अखेरची संधी

Fifa World Cup 2018 : स्पेनच्या दिग्गजांकडे छाप सोडण्याची अखेरची संधी

Next

माद्रिद : प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये संघर्ष करणाऱ्या स्पेनच्या सुवर्णमय पिढीतील उर्वरित स्टार खेळाडू कदाचित आपल्या अखेरच्या विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने सहभागी होतील.
नवे प्रशिक्षक युलेन लोपेटेगुई संघाला विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवून देईल किंवा नाही, अशी साशंकता होती, पण स्पेन संघ इटलीसारख्या संघाला पिछाडीवर सोडत विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्यात यश मिळवले. लोपेटेगुईने उदयोन्मुख प्रतिभा व अनुभव याचे योग्य मिश्रण करीत संघाला सलग ११ व्यांदा विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवून दिले. लोपेटेगुईने दिग्गज गोलकिपर इकेर कासिलासच्या स्थानी डेव्हिड डी गियाला संधी दिली. गिया याने मॅन्चेस्टर युनायटेड व राष्ट्रीय संघातर्फे चमकदार कामगिरी करीत लक्ष वेधले होते.
युरो २०१६ दरम्यान कासिलासला प्रथमच राखीव खेळाडूंमध्ये बसविण्यात आले. त्याला आता विश्वकप संघातही स्थान मिळाले नाही. सार्जियो रामोस व गेरार्ड पिक यांच्यासारख्या दिग्गज डिफेंडर्सचा कदाचित हा अखेरचा विश्वकप राहील. या दोघांनी संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळीही संघाला यांच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
३१ वर्षीय पिक याची विश्वकपनंतर स्पेनकडून न खेळण्याची योजना आहे तर ३२ वर्षीय रामोस आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होईल त्यावेळी मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ता ३४ वर्षांचा झालेला असेल आणि संघ या दिग्गजाला जेतेपदासाठी निरोप देण्यास प्रयत्नशील राहील.
इनिएस्ता आपल्या पास व चेंडूवरील नियंत्रणासाठी ओळखल्या जातो. स्पेन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धांमधील विजेतेपदक पटकावले आहे. २०१० च्या विश्वकप फायनलमध्ये नेदरलँडविरुद्ध त्याने विजयी गोल नोंदवला होता. (वृत्तसंस्था)

स्पेनला २००८ ते २०१२
या कालावधीत रोखणे जवळजवळ अशक्य झाले होते आणि या कालावधीत संघाने दोन युरोपियन चॅम्पियनशिप व विश्वविजेतेपद पटकावले होते. पण, २०१४ विश्वकप स्पर्धेपासून संघाच्या निराशाजनक कालखंड सुरू झाला. संघाला साखळी फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही आणि युरो २०१६ मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला.


 रस्रंल्ल्र२ँ ॅ्रंल्ल३२ ँं५ी ३ँी ’ं२३ ूँंल्लूी ३ङ्म ’ीं५ी ३ँी्र१ ें१‘

Web Title: Fifa World Cup 2018 :  Spanish giants have the last chance to leave their mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.