FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 02:37 PM2018-06-07T14:37:34+5:302018-06-07T14:37:34+5:30

फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर.

FIFA World Cup 2018: While watching football matches, these 'women' will be on the watch | FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

googlenewsNext
ठळक मुद्देफुटबॉलपटू मैदानात खेळत असताना त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायका सामना पाहायला आल्या आहेत का, हे जाणण्यात बऱ्याच जणांचा रस असल्याचे पाहिले गेले आहे.

मॉस्को : सध्याच्या घडीला साऱ्यांनाच वेध लागले आहेत ते रशियामध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे. साऱ्यांनाच विश्वचषकाचे सामने कधी सुरु होतील, याची उत्सुकता आहे. पण फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर. कारण फुटबॉलपटू मैदानात खेळत असताना त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा बायका सामना पाहायला आल्या आहेत का, हे जाणण्यात बऱ्याच जणांचा रस असल्याचे पाहिले गेले आहे. त्यामुळे ' या ' फुटबॉलपटूंच्या ' वॅग्स 'वर बऱ्याच जणांच्या नजरा असतील.

काही वर्षांपूर्वी इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमची पत्नी अॅश्ले ही लक्षवेधी ठरत होती. पण या विश्वचषकामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेयमार यांच्या ' वॅग्स ' यावेळी सर्वात जास्त चर्चेत असतील.

रोनाल्डो आणि रशियाची मॉडेल इरिया हिच्याबरोबर  अफेअर होते. पाच वर्षे हे अफेअर चालले. त्यानंतर या दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर सध्याच्या घडीला रोनाल्डोचे स्पॅनिश मॉडेल जॉर्जिना रॉर्डीगेझ अफेअर सुरु आहे. त्यामुळे जॉर्जिना रोनाल्डोला खेळताना पाहण्यासाठी मैदानात येणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारची गर्लफ्रेंड ब्रुनादेखील बऱ्याच जणांचे लक्ष वेधून घईल, असे म्हटले जात आहे.

अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू अँटोनेला रोकुझोबरोबर गेल्या वर्षी लग्न केले होते. अँटोनेला ही मेस्सीची बालमैत्रिण असल्याचे सांगण्यात आले होते. हे दोघे बरीच वर्षे एकमेकांबरोबर डेटिंग करत होते. पण अखेर गेल्या वर्षी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

रशियन ब्यूटीस...
रशिया म्हणजे सौंदर्यवतींची खाण, असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे रशियाच्या संघातील खेळाडूंच्या ' वॅग्स ' वर साऱ्यांची नजर असेल. रशियाचा गोलरक्षक इगोरची पत्नी कॅटेरिना अॅकेनफिव यावेळी चाहत्यांच्या रडारवर असेल. त्याचबरोबर मिस रशिया ठरलेली अनास्तासिया कोस्टेंको देखील विश्वचषकाचे सामने पाहायला येणार का, याची उत्सुकता बऱ्याच जणांना असेल.

Web Title: FIFA World Cup 2018: While watching football matches, these 'women' will be on the watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.