FIFA World Cup 2022: अर्जेंटिना-नेदरलँड्स सामन्यामध्ये घुसला पोर्नस्टार, छातीवर लिहिलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:18 PM2022-12-10T15:18:42+5:302022-12-10T15:19:03+5:30
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता.
दोहा - फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने शुक्रवारी रात्री अटीतटीच्या सामन्यात नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या तणातणीमुळे हा सामना गाजला. दरम्यान, खेळ सुरू असतानाच एक खेळाडू मैदानात घुसल्याने सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता.
मैदानात घुसलेल्या या व्यक्तीचं नाव विताली जोदोरोवेत्स्की आहे. तो एक रशियन यूट्युबर आहे. तत्पूर्वी २०१४ च्या वर्ल्डकपमध्येही त्याने असे कृत्य केले होते. विताली टॉपलेस होऊन मैदानात घुसला. त्याने छातीवर विताली GOAT असं लिहिलं होतं.
विताली याने पोर्न फिल्ममध्ये काम केलेलं आहे. त्याचे यूट्युबवर एक कोटींहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. विताली नियमितपणे एक्स रेटेड व्हिडीओ आपल्या यूट्युब चॅनलवर अपलोड करत असतो. वितालीची एक्स गर्लफ्रेंड किन्से वोलांस्की हिने २०१९ मध्ये बिकिनी घालून फुटबॉलच्या मैदानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. किन्से वोलांस्की याचेही इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.
अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात वितालीशिवाय अजून एका व्यक्तीने मैदानात धाव घेतली होती. लियोनेल मेस्सीने पेनल्टीवर गोल केल्यानंतर काही वेळाने सामन्यातील ७५ व्या मिनिटाला ही घटना घडली होती.