Fifa World Cup Final : मेस्सीने वर्ल्ड कप जिंकला, पण Golden Boot फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेने पटकावला, जाणून घ्या पूरस्कार विजेत्यांची लिस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:27 AM2022-12-19T00:27:48+5:302022-12-19T00:28:05+5:30

Fifa World Cup Final 2022 Live Updates : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल... ८

FIFA World Cup 2022 Awards: Kylian Mbappe wins Golden Boot, Lionel Messi secures the Golden Ball award, See the Full List Of Award Winners, And Prize Money   \ | Fifa World Cup Final : मेस्सीने वर्ल्ड कप जिंकला, पण Golden Boot फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेने पटकावला, जाणून घ्या पूरस्कार विजेत्यांची लिस्ट 

Fifa World Cup Final : मेस्सीने वर्ल्ड कप जिंकला, पण Golden Boot फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेने पटकावला, जाणून घ्या पूरस्कार विजेत्यांची लिस्ट 

googlenewsNext

Fifa World Cup Final 2022 Live Updates : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल... ८०व्या मिनिटाला २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले... कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून  हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.  

पेनल्टीचा थरार अन् फ्रान्सची हार.... 
कायलिन एमबाप्पे - १-० ( फ्रान्स )
लिओनेल मेस्सी - १-१ ( अर्जेंटीना) 
किंग्स्ली कोमन ( संधी गमावली ) - १-१ ( फ्रान्स) 
पॉलो डिबाला - २-१ ( अर्जेंटिना)
आरेलोना टी चौमेनी ( संधी गमावली ) - १-२ ( फ्रान्स)
लिएंड्रो पेरेडेस - ३-१ ( अर्जेंटीना) 
रँडल कोलो मौनी - २-३ ( फ्रान्स)
गोंझालो मॉटेई - ४-२ ( अर्जेंटीना) 
 
स्पर्धेतील पुरस्कार...
 

फ्रान्सच्या कायलिन एमबाप्पेला Golden Boot हा पुरस्कार मिळाला...  हा पुरस्कार सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. ज्यामध्ये सोन्याने बनवलेला एक जोडा असतो आणि त्याद्वारे खेळाडूला सन्मानित केले जाते. हा पुरस्कार १९८२ पासून सुरू करण्यात आला. उपविजेता ठरलेला फ्रेंच स्टार खेळाडू एमबाप्पेने संपूर्ण स्पर्धेत एकूण ९ गोल नोंदवले / त्यात अंतिम सामन्यातील तीन गोलचा समावेश आहे. लिओनेल मेस्सी या शर्यतीत ७ गोलसह दुसऱ्या स्थानावर  राहिला.


लिओनेल मेस्सीला Golden Ball हा पुरस्कार दिला गेला... हा पुरस्कार त्या खेळाडूला दिला जातो, ज्याने संपूर्ण स्पर्धेत  सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गोल्डन बॉलने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गौरव केला जातो. या पुरस्काराच्या स्वरूपात खेळाडूला सोन्याचा चेंडू भेट म्हणून दिला जातो. १९८२ च्या फिफा वर्ल्ड कपपासून हा पुरस्कारही सुरू झाला.  

अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला Golden Gloves हा पुरस्कार दिला गेला... हा पुरस्कार खास गोलरक्षकासाठी आहे. संपूर्ण विश्वचषकादरम्यान कोणता गोलरक्षक सर्वोत्तम गोलकीपिंग करतो. त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. हा पुरस्कार सन १९९४  मध्ये लेव्ह याशिन यांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आला आणि २०१०च्या विश्वचषक स्पर्धेत त्याचे नाव बदलून गोल्डन ग्लोव्हज करण्यात आले.   

अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेझ याला स्पर्धेतील Young Player  पुरस्काराने गौरविण्यात आले

 

अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस- फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात विजेता झालेल्या अर्जेंटिना संघाला 347 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले आहे. तर उपविजेत्या फ्रान्सच्या संघला 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को 206 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.

Web Title: FIFA World Cup 2022 Awards: Kylian Mbappe wins Golden Boot, Lionel Messi secures the Golden Ball award, See the Full List Of Award Winners, And Prize Money   \

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.