Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:17 IST2022-12-03T08:24:05+5:302022-12-03T12:17:55+5:30
Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली.

Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली. दक्षिण कोरिया, जपान, सेनेगल, मोरोक्को आदी संघांनी अनपेक्षित निकाल नोंदवताना बाद फेरीत प्रवेश मिळवला. आता जेतेपदासाठीचा खरा थरार आजपासून पाहायला मिळणार आहे. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लेव्हांडोवस्की या दिग्गजांचा कदाचीत हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकल्याने सर्वच कंबर कसून मैदानावर उतरतील यात शंका नाही. आजपासून सुरू होणाऱ्या Round 16 च्या फेरीत पहिला सामना नेदरलँड्स विरुद्ध अमेरिका असा होणार आहे आणि त्यानंतर मेस्सीचा अर्जेंटिना संघ मध्यरात्री ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
- ३२ मधून १६ आले आणि आता १६ मधून ८ असा प्रवास सुरू झाला आहे.
कोणत्या गटातून कोणते संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले?
गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक
A नेदरलँड्स सेनेगल
B इंग्लंड अमेरिका
C अर्जेंटिना पोलंड
D फ्रान्स ऑस्ट्रेलिया
E जपान स्पेन
F मोरोक्को क्रोएशिया
G ब्राझील दक्षिण कोरिया
H पोर्तुगाल स्वीत्झर्लंड
- युरोप ( ८) - नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्पेन, क्रोएशिया, पोर्तुगाल, स्वीत्झर्लंड
- आशिया ( ३) - जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया
- आफ्रिका ( २) - मोरोक्को, सेनेगल
- दक्षिण आमेरिका ( २) - अर्जेंटिना, ब्राझील
- उत्तर-मध्य अमेरिका ( १) - अमेरिका
FIFA World Cup: Round of 16 Schedule
- ३ डिसेंबर - नेदरलँड्स वि. अमेरिका - रात्री ८.३० वा.पासून
- ४ डिसेंबर - अर्जेंटिना वि. ऑस्ट्रेलिया - मध्यरात्री १२.३० वा. पासून
- ४ डिसेंबर - फ्रान्स वि. पोलंड - रात्री ८.३० वा.पासून
- ५ डिसेंबर - इंग्लंड वि. सेनेगल - मध्यरात्री १२.३० वा.पासून
- ५ डिसेंबर - जपान वि. क्रोएशिया - रात्री ८.३० वा. पासून
- ६ डिसेंबर - ब्राझील वि. दक्षिण कोरिया - मध्यरात्री १२.३० वा.पासून
- ६ डिसेंबर - मोरोक्को वि. स्पेन - रात्री ८.३० वा. पासून
- ७ डिसेंबर - पोर्तुगाल वि. स्वीत्झर्लंड - मध्यरात्री १२.३० वा. पासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"