Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिना फायनलमध्ये! लिओनेल मेस्सीचे 'स्वप्नपूर्ती'च्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:24 AM2022-12-14T02:24:37+5:302022-12-14T02:28:06+5:30

Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे, १९३०, १९९० व २०१४ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

Fifa World Cup 2022 Semi finals: ARGENTINA IS IN THE FINAL, Lionel Messi's step towards 'fulfilment' of his world cup dream beat Croatia by 3-0 | Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिना फायनलमध्ये! लिओनेल मेस्सीचे 'स्वप्नपूर्ती'च्या दिशेने पाऊल

Fifa World Cup Semi finals: अर्जेंटिना फायनलमध्ये! लिओनेल मेस्सीचे 'स्वप्नपूर्ती'च्या दिशेने पाऊल

googlenewsNext

Fifa World Cup Semi finals:  नेयमार, ख्रिस्तीयानो रोनाल्डो हे प्रतिस्पर्धी बाहेर पडल्यानंतर सर्वांच्या नजरा लिओनेल मेस्सी ( Lionel Messi) वर खिळल्या होत्या. अखेरचा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मेस्सीने  चाहत्यांना निराश नाही केले आणि अर्जेंटिनाकडून वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले. २०१८च्या उपविजेत्या क्रोएशियाला दर्जेदार खेळ करूनही हार मानावी लागली. दोन वेळच्या विजेत्या अर्जेंटिनाने ३-० अशा विजयासह फायनल गाठली. क्रोएशियाने खरंच संपूर्ण सामन्यात चांगला खेळ केला, परंतु आज नशीबाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. 

  • लिओनेल मेस्सी आज वर्ल्ड कप स्पर्धेतील २५ वा सामना खेळला.. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱ्या जर्मनीच्या लॉथर माथॉस यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. 
  • क्रोएशिया आणि अर्जेंटिना यांच्यातला आजचा तिसरा सामना आहे. १९९८ मध्ये अर्जेंटिनाने १-०असा विजय मिळाला, तर २०१८ मध्ये क्रोएशियाने ३-० असा विजय मिळवलेला.

सामन्यातील पहिल्या २० मिनिटे क्रोएशियाने पकड मजबूत ठेवली होती आणि लिओनेल मेस्सीला त्यांनी फार कौशल्य दाखवू दिले नाही. चेंडूवर सर्वाधिक ताबा क्रोएशियाने राखला, परंतु २२व्या मिनिटाला मेस्सीकडून पहिला प्रयत्न झाला आणि माजी विजेत्यांनी डोकं वर काढलं. पण क्रोएशियाचे संपूर्ण ११ खेळाडू खेळताना दिसले, उलट अर्जेंटिना मेस्सी केंद्रीत दिसला. पण,  ३२ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली आणि अर्जेंटिनाचे चाहते आनंदित झाले. लिओनेल मेस्सीने गोल करताना अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

#LionelMessi हा वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक ११ गोल करणारा खेळाडू बनला. त्याने थॉमस मूलर ( १०) व कायलीन एमबाप्पे (९) यांना मागे टाकले. ३९ व्या मिनिटाला ज्युलियन अलव्हारेजने काऊंटर आक्रमणात भन्नाट गोल करताना अर्जेंटिनाची आघाडी दुप्पट केली. ४३व्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलरक्षकाने अर्जेंटिनाचा तिसरा गोल रोखला. ४५व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने बचाव केला.  वर्ल्ड कपच्या तीन नॉक आऊट सामन्यात गोल कारणारा मेस्सी हा अर्जेंटिनाचा पहिला खेळाडू ठरला. अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये २-० अशी आघाडी कायम राखली.

अर्जेंटिनाने १९७८ आणि १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे, १९३०, १९९० व २०१४ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दुसऱ्या हाफमध्ये दोन बदलासह क्रोएशिया मैदानावर उतरला आणि छोटे छोटे पास करून ते सातत्याने अर्जेंटिनाच्या पेनल्टी क्षेत्रात चढाई करत होते. पण वाट्याला यश येत नसल्याने क्रोएशियन चाहत्यांच्या चेहऱ्यावरील तणाव प्रकर्षाने जाणवला. ५८ व्या मिनिटाला मेस्सीचा गोल क्रोएशियन गोलरक्षकाने रोखला. ६२व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलीने क्रोएशियाचा आणखी एक गोल अडवला. ६९व्या मिनिटाला मेस्सीच्या सुरेख पासवर अलव्हारेजने आणखी एक गोल केला. इथून क्रोएशियाचे पुनरागमन अशक्य होते. आता अर्जेंटिनाच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती.  अर्जेंटिनाने पुढची २० मिनिटे बचाव करत ३-० असा विजय पक्का केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. 

 

Web Title: Fifa World Cup 2022 Semi finals: ARGENTINA IS IN THE FINAL, Lionel Messi's step towards 'fulfilment' of his world cup dream beat Croatia by 3-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.