फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज - प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:38 AM2017-09-27T05:38:30+5:302017-09-27T05:38:39+5:30

फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली.

FIFA World Cup for FIFA World Cup 2015: Ready to host all venues in the country - Praful Patel | फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज - प्रफुल्ल पटेल

फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज - प्रफुल्ल पटेल

Next

नवी दिल्ली : फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली.
६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चालणा-या स्पर्धेला आता दहा दिवस उरले आहेत. एकूण सहा आयोजन स्थळांवर सामने खेळविले जाणार असून यापैकी पाच आयोजन स्थळे स्थानिक आयोजन समितीच्या सुपूर्द करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आज बुधवारी सोपविले जाईल, असे पटेल यांनी सांगितले.
स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन असलेले पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘२०१२ मध्ये सुरू झालेला आयोजन तयारीचा प्रवास रोमहर्षक ठरला. सर्वच पायाभूत सुविधा साकारण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदा फिफा कार्यकारी समितीची बैठक भारतात कोलकाता येथे २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. फिफाने भारतातील आयोजन स्थळे आणि सोईसुविधा यावर समाधान व्यक्त केले आहे.’ भारताचा सलामीचा सामना ६ आॅक्टोबर रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचा संघ पहिल्यांदा फिफाच्या एखाद्या स्पर्धेत सहभागी होत असून सर्वच खेळाडू उत्साही असल्याचे पटेल यांनी सांगितले. फिफाच्या २० वर्षांखालील विश्वचषकाच्या यजमानपदासाठी बोली लावण्यासंदर्भात विचारताच पटेल म्हणाले,‘ आमच्याकडे पायाभूत सुविधा तयार आहे. आम्ही फिफाकडे २० वर्षे गटाच्या विश्वचषकासाठी बोली लावण्याचा मुद्दा लावून धरणार आहोत.’ १७ वर्षे गटाच्या संघावर स्पर्धेनंतरही मेहनत सुरूच राहील. कोचेसना तसे निर्देश देण्यात आले आहेत. आमच्याकडे १६ वर्षे गटाचा संघदेखील तयार आहे.
विविध गटाच्या संघ बांधणीसाठी एआयएफएफ मेहनत घेत असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
भारतीय संघाचे कोच डी माटोस यांना संघाच्या तयारीबाबत विचारताच ते म्हणाले,‘ मी फेब्रुवारीत सुरुवात केली. सहा महिन्यात मी त्यांच्यावर मेहनत घेतली. आमचे लक्ष्य चांगली कामगिरी हेच असेल. यजमान म्हणून दडपण नाहीच.(वृत्तसंस्था)

पहिल्या सामन्याची २० हजार तिकिटांची विक्री
मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होणाºया पहिल्या सामन्यासाठी २० हजारहून तिकिटांची विक्री झाली आहे. ६ आॅक्टोबर रोजी हा सामना होईल. सूत्रांनुसार, या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ४५ हजार एवढी आहे. स्पर्धा सुरू होण्यास आता केवळ दहा दिवस उरले आहेत. पहिल्या दोन सामन्यांची सर्व तिकिटे विकली जाईल, अशी आशा आहे.

‘तगड्या संघांना टक्कर देण्यास सज्ज’
देशात पहिल्यांदाच होणाºया १७ वर्षांखालील फुटबॉल महासंग्रामासाठी गेल्या दोन वर्षांपासून खेळाडू घाम गाळत आहेत. या मोठ्या स्पर्धेत आम्ही तगड्या संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा विश्वास भारतीय कर्णधार अमरजित याने व्यक्त केला.

विश्व दर्जाचे‘सेंटर आॅफ एक्सलन्स’
अ.भा. फुटबॉल महासंघ खेळाडूंसाठी सर्वसुविधायुक्त असे विश्व दर्जाचे ‘सेंटर आॅफ एक्सलन्स’स्थापन करणार आहे. ते कुठल्या शहरात होणार हे अद्याप निश्चित नाही. स्थळ भारतातील फिफा विश्वचषक संपल्यांनतर जाहीर होणार असल्याची घोषणा पटेल यांनी केली.या सेंटरमध्ये सरावाच्या सुविधांसह जलतरण तलाव आणि अन्य सोई राहतील. यावर १०० कोटीचा खर्च अपेक्षित असून फिफासह खासगी प्रायोजकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पटेल म्हणाले.

सराव सामन्यांसाठी मोफत प्रवेश
विश्वचषकाआधी अंधेरीच्या फुटबॉल एरिनामध्ये दोन सराव सामन्यांसाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील. येथे ब्राझील- न्यूझीलंड हा सामना २८ सप्टेंबर रोजी आणि न्यूझीलंड- इंग्लंड सामना १ आॅक्टोबर रोजी खेळविला जाईल.

Web Title: FIFA World Cup for FIFA World Cup 2015: Ready to host all venues in the country - Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा