Fifa World Cup Final : लिओनेस मेस्सीचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कप इतिहासात असा विक्रम आजतागायत कुणालाच जमला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:07 PM2022-12-18T21:07:37+5:302022-12-18T21:07:52+5:30
Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं...
Fifa World Cup Final 2022 Live Updates : ६०२९ दिवसांपूर्वी लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केलं होतं... २०१४ला वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु जर्मनीने त्याचा स्वप्न भंग केला... पण, २०२२ मध्ये अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर ज्युलियन अलव्हारेजने बायसिकल किक मारून पेनल्टी क्षेत्रात गोल करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या गोलीने तो रोखला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उचलला होता. पाचव्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून ऑन टार्गेट प्रयत्न झाला. अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.
🐐🇦🇷 pic.twitter.com/iI3hcEwgrT
— كأس العالم FIFA 🏆 (@fifaworldcup_ar) December 18, 2022
९व्या मिनिटाला अर्जेंटिनाने कॉर्नर कमावला अन् फ्रान्सच्या बचावपटूंनी चांगलाच कस लागलेला पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा प्रत्येक खेळाडू आज गोलसाठी भूकेला दिसला. फ्रान्सच्या बचावपटूंना आज निवांत श्वास घ्यायलाच दिला जात नव्हता.. १३व्या मिनिटाला कायलिन एमबाप्पेने फ्रान्ससाठी गोल करण्याचा पहिला प्रयत्न केला. कधीही डिफेन्सीव्ह खेळावर भर न देणाऱ्या फ्रान्सला आज अर्जेंटिनाच्या पवित्र्यामुळे कोशात जावे लागले. १७व्या मिनिटाला मेस्सीने फ्रान्सच्या बचावातील त्रुटी उघड्यावर पाडल्या, परंतु डी मारियाला चेंडूला अंतिम दिशा देता आली नाही अन्यथा अर्जेंटिनाचा हा सुपर डुपर गोल होताच. १९व्या मिनिटाला डी पॉलने पेनल्टी बॉक्सबाहेर फाऊल केला अन् फ्रान्सला फ्री किक मिळाला. ऑलिव्हर जिरूडने हवेत गरूड भरारी घेत हेडरद्वारे चेंडूला दिशा दिली, परंतु तो पोस्टच्या वरून गेला.
२१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला.. अर्जेंटिनाने २३व्या मिनिटाला गोल केला. ग्रुप स्टेज, राऊंड १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल... एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा मेस्सी हा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला. १९५८ मध्ये स्वीडनच्या लिल्स लिएडोल्म ( ३५ वर्ष व २६४ दिवस) यांच्या नावावर हा विक्रम आहे. मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत १२ गोल केले आहेत आणि ८ गोल सहाय्य आहे. १९६६ पासूनच्या वर्ल्ड कप इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
ग्रुप स्टेज, राऊंड १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल... एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला. #LionelMessi𓃵#Messi#ArgentinaVsFrance#FIFAWorldCupFinalhttps://t.co/tpjmuZeUba
— Swadesh Ghanekar (@swadeshLokmat) December 18, 2022